मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Bandra-Worli Sea Link : वांद्रे- वरळी सी लिंकवर १ एप्रिलपासून टोलवाढ; जाणून घ्या नवे दर

Bandra-Worli Sea Link : वांद्रे- वरळी सी लिंकवर १ एप्रिलपासून टोलवाढ; जाणून घ्या नवे दर

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Mar 29, 2024 04:27 PM IST

Bandra- Worli Sea Link Toll Hike: मुंबईतील वांद्रे-वरळी सी लिंकवरील टोलचे दर १ एप्रिलपासून १८ टक्क्यांनी वाढणार आहेत.

मुंबईच्या वांद्रे वरळी सी-लिंकवरील प्रवास आता महागणार आहे.
मुंबईच्या वांद्रे वरळी सी-लिंकवरील प्रवास आता महागणार आहे.

Bandra- Worli Sea Link Toll News: आधीच महागाईच्या झळा सोसणाऱ्या सर्वसामान्यांच्या खिशावर आणखी ताण पडणार आहे. वांद्रे- वरळी सी लिंकवरून प्रवास करणाऱ्या वाहनांना येत्या ०१ एप्रिलपासून टोलसाठी वाढीव पैसे मोजावे लागणार आहेत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ म्हणजेच एमएसआरडीसीने राजीव गांधी वांद्रे-वरळी सी लिंकच्या टोल शुल्कात १८ टक्क्यांनी वाढ जाहीर केली. वांद्रे- वरळी सी लिंकवरून असंख्य वाहनचालक ये- जा करतात.

आठ पदरी ओव्हरपासचा वापर करणाऱ्या वाहनचालकांना आता कार आणि जीपसाठी ८५ रुपये, मिनीबस, टेम्पो आणि हलक्या व्यावसायिक वाहनांसाठी १३० रुपये, तर दुचाकी ट्रक आणि बससाठी १७५ रुपये मोजावे लागत आहेत. मात्र, या दरात ०१ एप्रिल २०२३ पासून बदल होण्याची शक्यता आहे.

Mumbai Shared Cabs Fare Hike: मुंबई ते पुणे, नाशिक आणि शिर्डी शेअर कॅबच्या भाड्यात वाढ, आता ‘इतके’ पैसे मोजावे लागणार!

एमएसआरडीसीच्या प्रवक्त्याने पीटीआयला सांगितले की, कार आणि जीपच्या एकेरी प्रवासासाठी नवीन टोल दर पुढील महिन्याच्या सुरुवातीपासून १०० रुपये असतील. तर, मिनीबस, टेम्पो आणि तत्सम वाहनांसाठी १६० रुपये मोजावे लागतील. २००९ मध्ये वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेल्या सी लिंकवरील नवीन टोल दर ०१ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०१७ या कालावधीत लागू असतील. एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहनचालकांना ५० आणि १०० टोल कूपन बूक खरेदी केल्यास अनुक्रमे १० टक्के आणि २० टक्के सवलत मिळणार आहे.

मरीन ड्राइव्ह-वरळी कोस्टल रोड आणि उत्तर टोकाला वांद्रे-वर्सोवा कोस्टल रोडला सी लिंक जोडण्याची योजना प्रशासनाने आखली आहे. वरळी ते मरिन ड्राइव्ह दरम्यान च्या १०.५ किमी लांबीच्या कोस्टल रोड प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नुकतेच झाले. हा भाग सध्या टोलफ्री आहे. सी लिंकच्या दोन्ही टोकांवरील कोस्टल रोडला जोडल्यानंतर कोस्टल रोडवरील वाहनांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.

IPL_Entry_Point

विभाग