Titvala: महिला घरातही असुरक्षित! सासरा, दीर आणि मामेभावाकडून विवाहितेवर सामूहिक बलात्कार-titvala women gangrape by father in law brother in law and minor relative ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Titvala: महिला घरातही असुरक्षित! सासरा, दीर आणि मामेभावाकडून विवाहितेवर सामूहिक बलात्कार

Titvala: महिला घरातही असुरक्षित! सासरा, दीर आणि मामेभावाकडून विवाहितेवर सामूहिक बलात्कार

Sep 08, 2024 08:34 PM IST

Titvala GangRape: टिटवाळ्यात सासरा, दीर आणि अल्पवयीन मुलाने विवाहितेवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली.

टीटवाळा: दीर आणि मामेभावाकडून विवाहितेवर सामूहिक बलात्कार
टीटवाळा: दीर आणि मामेभावाकडून विवाहितेवर सामूहिक बलात्कार

Titvala GangRape News: बदलापूर अत्याचार प्रकरण ताजे असताना टिटवाळा परिसरातून अशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली. एका विवाहित महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी पीडिताचा सासरा, दीर आणि मामे भावाला पोलिसांनी ताब्यात घेऊन पुढील तपास सुरु केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, पीडिताचा मामे भाऊ अल्पवयीन असल्याचे समोर आले. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली.

मिळालेल्या माहितीनुसार, टिटवाळा परिसरात राहणाऱ्या एका महिलेवर घरात सासरा आणि दिरासह एका अल्पवयीन मामेभावाने सामूहिक बलात्कार केला. घरात कुणी नसताना हा सगळा प्रकार घडला.महिलेने ही बाब कामावरून आलेल्या आपल्या पतीला सांगितली. परंतु, पीडिताच्या पतीने तिचे म्हणणे ऐकून घेण्याऐवजी तिलाच मारहाण केली. या मारहाणीत महिला गंभीर जखमी झाली. यानंतर पीडित महिलेला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्यावर दोन दिवस उपचार करण्यात आले. अखेर महिलेने तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला.

टिटवाळा कल्याण ग्रामीण पोलिसांनी पीडित महिलेचा सासरा, दीर आणि अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. सुनील वाघे (वय-२२, दीर) आणि काशिनाथ वाघे (वय- ५०, सासरा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

कल्याणमध्ये दोन वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार

टिटवाळ्याजवळ दोन वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या ३५ वर्षीय तरुणाला कल्याण ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीला शनिवारी कल्याणयेथील पॉक्सो न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली, जेव्हा मुलगी आपल्या भावंडांसह आणि इतर मुलांसह घराबाहेर खेळत होती. त्यावेळी आरोपीने तिला चॉकलेट आणि मिठाईचे आमिष दाखवून तिला निर्जन स्थळी नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर आरोपीने पीडिताला तिथेच सोडून पळून गेला. मुलीचा रडण्याचा आवाज ऐकून एका पादचाऱ्याने तिला घरी नेले. परंतु, मुलगी सतत रडत असल्याने पालकांनी तिला उल्हानगर येथील मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय तपासणी केली असता डॉक्टरांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती दिली. या प्रकरणी शेजारी राहणाऱ्या ३५ वर्षीय तरुणाविरोधात लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायद्यांतर्गत अपहरण आणि लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला.

Whats_app_banner
विभाग