मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune traffic news : श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त पुण्यात चोख बंदोबस्त, वाहतूक व्यवस्थेतही मोठा बदल

Pune traffic news : श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त पुण्यात चोख बंदोबस्त, वाहतूक व्यवस्थेतही मोठा बदल

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jan 22, 2024 01:06 PM IST

Pune traffic news : अयोध्या येथे श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त पुण्यात चोख बंदोबस्त ठेववण्यात आला आहे. तसेच शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याने वाहतुकीत देखील मोठा बदल करण्यात आला आहे.

Pune traffic news
Pune traffic news

Pune traffic news : अयोध्या येथे श्री राम मंदिर प्राण प्रतिष्ठापणा सोहळा अवघ्या देशात जल्लोषात साजरा केला जात आहे. या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पुण्यात देखील या सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. विविध मंदिरात धार्मिक विधी होणार आहे. तसेच शहरातून शोभा यात्रा काढण्यात येणार आहे. त्यानिमित्त पुण्यात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून वाहतुकीत देखील मोठा बदल करण्यात आला आहे.

Ayodhya Ram Mandir : प्रभू श्री रामाच्या स्वागतासाठी अयोध्येत पेटलवी तब्बल १०८ फूट लांब अगरबत्ती; पाहा फोटो

पुण्यात श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त विविध संस्थांकडून शोभायात्रा काढण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर शहरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या सोबतच वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे त्या ठिकाणी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. तसेच अनुचित प्रकार टाळण्यासाठी शहरात विविध ठिकाणी दीड हजार पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आले आहे.

Viral Video: १४ लाख दिव्यांपासून साकारली श्रीरामाची प्रतिमा, व्हिडीओ पाहून सगळेच थक्क!

शिवाजीनगर पोलीस मुख्यालयातील अतिरिक्त कुमक बंदोबस्तासाठी तैनात राहणार आहे. राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ) दोन तुकड्या बंदोबस्तास ठेवण्यात आल्या, असे गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी सांगितले.

कात्रज डेअरी परिसरात वाहतूक बदल

कात्रज येथील कार्यसिद्धी प्रतिष्ठानकडून सोमवारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने कात्रज डेअरी प्रवेशद्वार क्रमांक तीन ते वसंत विहार सोसायटी ते अहिल्यादेवी उद्यान दरम्यान असलेला रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे.

जंगली महाराज रस्त्यावर शोभा यात्रा

राम मंदिर प्रतिष्ठापणा सोहळ्यानिमित्त पुण्यात जंगली महाराज ट्रस्ट तर्फे शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही शोभा यात्रा ५ वाजता काढण्यात येणार आहे. नागरिकांनी या यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

WhatsApp channel

विभाग