तिकीट चेकरची अरेरावी! मराठी बोलण्यास नकार देत प्रवाशाला रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले! नालासोपारा येथील घटना
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  तिकीट चेकरची अरेरावी! मराठी बोलण्यास नकार देत प्रवाशाला रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले! नालासोपारा येथील घटना

तिकीट चेकरची अरेरावी! मराठी बोलण्यास नकार देत प्रवाशाला रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले! नालासोपारा येथील घटना

Nov 05, 2024 12:42 PM IST

Nalasopara News : मुंबईत काही दिवसांपुरी एका टीसीची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. यात मराठी द्वेष करत असल्याचं आढळलं होतं. त्याच प्रकारे नालासोपारा येथे देखील अशीच एक घटना उघडकीस आली आहे. मराठी बोलण्यास नकार देत टीसीने प्रवाशाला पोलिसांच्या हवाली करत मराठीची सक्ती करणार नाही असे लिहून घेतले.

मराठी बोलण्यास नकार देत तिकिट चेकरची अरेरावी! प्रवाशाला रेल्वे पोलिसांच्या केले हवाली; मुंबईच्या नालासोपारा येथील घटना
मराठी बोलण्यास नकार देत तिकिट चेकरची अरेरावी! प्रवाशाला रेल्वे पोलिसांच्या केले हवाली; मुंबईच्या नालासोपारा येथील घटना

Nalasopara News : मुंबईत उत्तर भारतीयांचा मराठी द्वेष अद्याप कमी झालेला नाही. नालासोपारा येथील रेल्वे स्थानकावर एका तिकिट तपासणीसने एका व्यक्तीला अडवत त्याच्या कडे तिकिट मागितले. मात्र, त्या व्यक्तीला हिंदी भाषा समजत नसून मराठी भाषानेत बोलण्याची विनंती केली. मात्र, तिकिट तपासणीसने मराठी भाषेत बोलण्यास नकार देत प्रवाशासोबत अरेरावी करत त्याला रेल्वे पोलिसांकडे नेत कागदावर मराठी भाषेचा आग्रह धरणार नाही असे लिहून घेतले. पीडित व्यक्तीने ही घटना सोशल मिडियावर व्यक्त केल्यावर ही घटना उघड झाली असून नेटकऱ्यांनी या घटनेचा निषेध करत संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, या प्रकरणी मराठी एकीकरण समितीने रेल्वे स्थानकावर आंदोलंन केले असून संबंधित तिकिट तपासणीसाला बडतर्फ करण्याची मागणी केली आहे.

रितेश मोर्य असे अरेरावी करणाऱ्या तिकिट तपासणीसाचे नाव आहे. तर अमित पाटील असे पीडित व्यक्तिचे नाव आहे. त्याने सोशल मिडियावर त्याच्याकडून जबरदस्तीने मराठी भाषेची सक्ती करणार नाही असे लिहून घेतले. या घटनेचे वृत्त असे की, अमित पाटील नामक व्यक्ति ही काही दिवसांपूर्वी लोकलने प्रवास करून नालासोपारा रेल्वे स्थानकावर उतरली. तो स्थानकाबाहेर जात असतांना रितेश मोर्य नामक तिकिट तपासणीसाने त्याला अडवले. त्याला हिन्दीमध्ये विचारत तिकिट कुठे आहे याची मागणी केली. पाटील यांना हिंदी समजत नव्हती. त्यांनी मोर्य यांना मला मराठी भाषा समजते मला हिंदी येत नाही. त्यामुळे तुम्ही मला मराठीत विचारा असे म्हटले. यामुळे मोर्य याला पाटील यांचा राग आला. त्याने अरेरावी करत पाटील यांना रेल्वे पोलीसांकडे घेऊन गेला. मराठी भाषेची सक्ती करणार नाही असे लिहून घेतले.

त्याच्या सोबत घडलेला हा प्रसंग त्याने सोशल मिडीयावर व्यक्त केला. त्यानंतर ही पोस्ट व्हायरल झाली. अनेकांनी या घटनेवर संताप व्यक्त करत आरोपीवर कारवाईची मागणी केली. दरम्यान, मराठी एकीकरण समितीने देखील याची देखल घेत आज नालासोपारा रेल्वे स्थानकावर जात मोर्य याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.

नेटकरी भडकले

सोशल मीडियावरील एकाने लिहिले की, परप्रांतीयांची मुजोरी पाहा. हा भाषिक दहशतवाद आहे. नालासोपारा स्टेशनवर एका टीसीने एका लोकल प्रवाशाकडून मराठीची सक्ती करणार नाही हे लिहून घेतले. महाराष्ट्रात हिंदी भाषिकांचे असे वर्चस्व?" असे लिहिले आहे.

पश्चिम रेल्वेने घटणेवर केला खुलासा

दरम्यान, पश्चिम रेल्वेने या प्रकारावर खुलासा केला आहे. त्यांनी या प्रकरणी ट्विटरवर पोस्ट करत, पश्चिम रेल्वे देशातील सर्व भाषा आणि प्रवाशांचा आदर करते तसेच विविधतेत एकतेवर विश्वास ठेवते. आमच्यासाठी सर्व धर्म, भाषांचे प्रवासी आणि प्रदेश समान आहेत, आणि त्यांना उत्कृष्ट सेवा प्रदान करणे हे आमचे ध्येय आहे. या प्रकरणाची चौकशी केली जाईल व कुणी दोषी आढळल्यास त्याच्यावर कारवाई केली जाईल, असे म्हटलं आहे.

काही दिवसांपूर्वी एका रेल्वे टीसीची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. यात मराठी माणसाला बिसनेस देणार नाही असे त्यानं म्हटलं होतं. ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यावर रेल्वेने त्याला बडतर्फ केलं होतं. या प्रकरणी रेल्वे काय कारवाई करणार या कडे सर्वांचे लक्ष आहे.

मराठी एकीकरण समितीचेचा नालासोपारा रेल्वे स्थानकावरती ठिय्या

मराठी एकीकरण समितीने या घटनेची दखल घेतली. मराठी एकीकरण समितीच्या कार्यकऱ्यांनी या घटनेप्रकरणी नालासोपारा रेल्वे स्थानकावरती ठिय्या आंदोलन केले. मराठी राज्यात मराठीला मान नसेल तर लाज वाटली पाहिजे आपल्याला, असे म्हणत त्यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. मराठी एकीकरण समिती यासाठी लढत आहे याचा अभिमान असून मराठीचा अपमान सहन करून घेणार नाही. संबंधित व्यक्तिवर कारवाई झालीच पाहिजे,अशी मागणी त्यांनी केली.

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर