Ambernath News : बिस्किटाच्या मशीनमध्ये अडकून ३ वर्षांच्या मुलाचा मृत्यू; अंबरनाथ येथील घटना
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ambernath News : बिस्किटाच्या मशीनमध्ये अडकून ३ वर्षांच्या मुलाचा मृत्यू; अंबरनाथ येथील घटना

Ambernath News : बिस्किटाच्या मशीनमध्ये अडकून ३ वर्षांच्या मुलाचा मृत्यू; अंबरनाथ येथील घटना

Sep 04, 2024 09:50 AM IST

Ambernath News : अंबरनाथ येथे एक मनाला चटका लावणारी घटना घडली आहे. आई सोबत एका बिस्किट कंपनीत गेलेल्या मुलाचा तेथील मशीनमध्ये अडकून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

बिस्किट खायला गेला अन् आई-वडिलांचा एकुलता एक काळजचा तुकडा हरपला; अंबरनाथमध्ये नेमकं काय घडलं, वाचा
बिस्किट खायला गेला अन् आई-वडिलांचा एकुलता एक काळजचा तुकडा हरपला; अंबरनाथमध्ये नेमकं काय घडलं, वाचा

Ambernath News : अंबरनाथ येथील एमआयडीसीत एक मनाला चटका लावणारी घटना उघडकीस आली आहे. येथील आनंदनगर एमआयडीसीतील बिस्कीट कंपनीत काम करणाऱ्या एका महिलेच्या ३ वर्षांच्या मुलाचा कंपनीतील मशीनमध्ये अडकून मृत्यू झाला. मुलाला सांभाळण्यासाठी घरी कुणी नसल्याने ही महिला मुलाला कंपनीत घेऊन गेली होती. मात्र, या कंपनीत मुलांचा मृत्यू झाल्यानं तिच्यावर दुख:चा डोंगर कोसळला आहे. ही घटना मंगळवारी सकाळी ८.३० च्या सुमारास 'राधे कृष्ण बेकर्स' या कंपनीत घडली.

आयुष चौहान असे या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. तर पूजा चव्हाण असे या मुलाच्या आईचे नाव आहे. पूजा चव्हाण या  मूळच्या बिहार येथील आहेत. काही महिन्यांपूर्वी त्या अंबरनाथ येथे कामासाठी आल्या होत्या. त्या अंबरनाथ पूर्वेतील ठाकूरपाडा भागात राहत असून त्या येथील बिस्किट कारखान्यात कम करणाऱ्या कामगारांना जेवणाचा डबा पुरवण्याचे काम करत होत्या. मंगळवारी सकाळी पूजा या ८.३०च्या सुमारास पूजा 'राधे कृष्ण बेकर्स' या कंपनीत डबे पोहोवण्यासाठी गेल्या होत्या. घरी मुलाला सांभाळण्यासाठी कुणी नसल्याने त्यांनी त्यांच्या मुलाला देखील सोबत नेले होते. यावेळी, आयुष हा बिस्कीट खाण्यासाठी मशिनच्या दिशेने गेला. यावेळी बिस्किट तयार करणाऱ्या मशीनचा बेल्ट आयुषच्या गळ्याला लागून तो त्यात अडकला. ही घटना काही कामगारांच्या लक्षात आली. त्यांनी त्याला तातडीने बाहेर काढले. व त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार करण्यापूर्वीच त्याच्या मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

बिस्किट घेण्यासाठी मशीन जवळ गेला अन्....

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयुष हा आई पूजा कुमारी नितेश चौहान (वय २२) हिच्या सोबत येथील एका बिस्किट कंपनीत काही कामगारांना डब्बा देण्यासाठी आला होता. मंगळवारी सकाळी या कंपनीत दोघेही डब्बे घेऊन आले असता यावेळी कारखान्यातील मशीनच्या बेल्टवरून बिस्किटे एका मागून एक जात असल्याचं आयुषला दिसलं. यातील एक बिस्कीट उचलण्यासाठी आयुष्य तिथं गेला. या वेळी तो या मशिनच्या बेल्टमध्ये अडकला. कामगारांनी तातडीने मशीन बंद केली. आयुषला उल्हासनगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याचा मृत्यू झाला होता. आयुष हा त्याच्या आईचा एकुलता एक मुलगा होता. या प्रकरणी आई पूजा कुमारी चौहान यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून गुन्हा दाखल केला आहे.

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर