three people died in the same house due to gas leak : वसई येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घरात गॅस गळती झाल्याने एकाच कुटुंबीतील तीन तरुणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना वसई पश्चिममधल्या माणिकपूर येथे रविवारी दुपारी घडली.
मोहम्मद आझम असे एकाचे नाव असून इतर दोघांची ओळख अद्याप पटलेली नाही. मोहम्मद आझम याचा फळ विक्रीचा व्यवसाय आहे हे सर्व मयत ३० ते ३५ वयोगटातील आहेत. मृतांचा कुटुंबियांना संपर्क करण्यात आला असून हे सगळे उत्तर प्रदेशचे रहिवासी असल्याची माहिती पुढे आली. हे सर्व मे महिन्यात ते या इमारतीत भाड्याने राहण्यासाठी आले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वसई पश्चिमेच्या माणिकपूर परिसरातील नौपाडा येथे आशा सदन नावाची दोन मजली इमारत आहे. या इमारतीतून रविवारी दुपारी एका सदानिकेतून गॅसचा वास येऊ लागला होता. हा वास उग्र असल्याने तसेच शेजारी प्रतिसाद देत नसल्याने याची माहिती शेजाऱ्यांनी पोलिसांना दिली. माणिकपूर पोलिसांने एक पथक घटनास्थळी आले. त्यांनी आवाज दिला असता कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी घराचे दार तोडून उघडले. यावेळी तीन तरुणांचे मृतदेह घरात आढळून आले. दोघांचे मृतदेह हे हॉलमध्ये तर एक मृतदेह स्वयंपाकघरात आढळून आला.
वसई पश्चिमेकडील माणिकपूर परिसरात नौपाडा येथे आशा सदन नावाची दोन मजली इमारत आहे. रविवारी दुपारी या इमारतीच्या एका घरातून गॅसचा वास यायला लागला, याची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली. यानंतर माणिकपूर पोलीस दार तोडून खोलीत गेले. दार तोडल्यानंतर रूममध्ये जे पाहिलं ते पाहून पोलिसांनाही धक्का बसला. घरामध्ये तीन जणांचे मृतदेह आढळून आले.
तीन मृतदेहांपैकी दोन मृतदेह हॉलमध्ये तर एक मृतदेह स्वयंपाक घरात आढळून आला. मृतांपैकी एकाची ओळख पटली असून त्याचं नाव मोहम्मद आझम असं आहे. मोहम्मद आझम याचा फळ विक्रीचा व्यवसाय आहे. दरम्यान, घरातील गॅस हा सुरू होता. घरात गॅस गळती झाल्यामुळे तिघांचा गुदमरून मृत्यू झाला असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. माणिकपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष चौधरी म्हणाले, पोलिस पथक घरात गेल्यावर त्यांना मृतदेह आढळले. घरात गॅस सुरू असल्याने त्यांचा मृत्यू हा गॅसगळतीने झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे.