BMC chief’s post : मुंबई शहराचा नवीन बॉस कोण होणार ? 'या' अधिकाऱ्यांची नावे चर्चेत
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  BMC chief’s post : मुंबई शहराचा नवीन बॉस कोण होणार ? 'या' अधिकाऱ्यांची नावे चर्चेत

BMC chief’s post : मुंबई शहराचा नवीन बॉस कोण होणार ? 'या' अधिकाऱ्यांची नावे चर्चेत

Published Mar 20, 2024 09:09 AM IST

BMC chief’s post : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. मुंबई महानगर पालिकेच्या आयुक्तांची देखील बदली करण्यात आली आहे. त्यामुळे आता नवीन अधिकारी कोण येणार या कडे लक्ष लागून आहे.

मुंबई शहराचा नवीन बॉस कोण होणार ? 'या' अधिकाऱ्यांची नावे चर्चेत
मुंबई शहराचा नवीन बॉस कोण होणार ? 'या' अधिकाऱ्यांची नावे चर्चेत

BMC chief’s post : भारतीय निवडणूक आयोगाने मंगळवारी मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांची बदली केली. राज्य सरकारने त्यांना मुदतवाढ देण्याची विनंती केली होती. मात्र, निवडणूक आयोगाने ही विनंती फेटाळून लावत अपयश आले. आता निवडणूक आयोगाने राज्य सरकारला मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई आयुक्तांच्या पदांसाठी प्रत्येकी तीन IAS अधिकाऱ्यांची नावे पाठवण्यास सांगितले आहे.

निवडणुक जाहीर होताच मोदी सरकारचे व्हॉट्सॲपवर मेसेज, विरोधकांची निवडणूक आयोगाकडे तक्रार

मिळालेल्या माहितीनुसार सामान्य प्रशासन विभागाने मुख्यमंत्र्यांच्या सचिवालयाने निवडणूक आयोगाने सांगितल्या नुसार अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी (१९९१ IAS बॅच), बेस्ट महाव्यवस्थापक अनिल डिग्गीकर (१९९१ IAS बॅच) आणि एमएम आरडीए आयुक्त डॉ. संजय मुखर्जी (१९९६) यांची नावे पाठवली आहेत. दरम्यान, यापूर्वी, गगराणी यांच्या नावावर एकमत झाले होते, परंतु आता निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार तीन जणांची नवे पाठवण्यात आली आहे.

महाराष्ट्र मुख्य निवडणूक आयोगाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, मुख्य निवडणूक आयुक्त आणि दोन निवडणूक आयुक्त आज बुधवारी दुपारी या नावावर चर्चा करून अंतिम निर्णय देणार आहेत. राज्य सरकारने पी. वेलरासू आणि अश्विनी भिडे यांच्यासह अतिरिक्त महापालिका आयुक्तांच्या बदल्या केल्या आहेत. निवडणूक आयोगाने सर्व महापालिका आयुक्त, अतिरिक्त महापालिका आयुक्त आणि तीन वर्षांहून अधिक कालावधी पूर्ण केलेले उपमहापालिका आयुक्त, चार वर्षांपेक्षा अधिक काळ जिल्ह्यात काम केलेले अधिकारी आणि त्यांच्या गृहजिल्ह्यात नियुक्ती झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यास सांगितले होते. हे अधिकारी मतदान प्रक्रियेशी जोडलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

Maharashtra Weather update : विदर्भात आजही गारपीटीचा इशारा; 'या' जिल्ह्यांना दिला ऑरेंज अलर्ट; पुण्यात तापमान होणार वाढ

मुंबई महानगर पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांची मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालकपदी बदली करण्यात आली. यापूर्वी त्यांनी या पदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळला होता. बीएमसीचे अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांचीही बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भिडे यांच्या जागी जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक अमित सैनी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

बदली झालेले मुंबईचे महापालिका आयुक्त चहल यांची ८ मे २०२० रोजी प्रवीण परदेशी यांच्या जागी नेमणूक करण्यात आली होती. करोना काळात महापालिका आयुक्त म्हणून त्यांनी चांगली कामगिरी केली. भाजप आणि शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे सरकारने सत्ता हाती घेतल्यानंतर त्यांना आयुक्तपदी कायम ठेवण्यात आले होते.

भिडे यांची ९ मे २०२० रोजी बीएमसीमध्ये अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. शिवसेना-भाजप सत्तेत आल्यावर त्यांना मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता. त्या १९९५ च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत आणि प्रधान सचिव दर्जाच्या आहेत.

Pune Drugs racket : मेफेड्रोन तस्करी पुन्हा मोठी कारवाई! पुणे, दिल्लीत छापेमारीत १६ लाखांचे ड्रग्स जप्त

वेलरासू यांनी मुंबई पालिकेत प्रभारी अतिरिक्त महापालिका आयुक्त म्हणून काम पाहिले असून त्यांची नियुक्ती ही १७ जानेवारी २०२० रोजी झाली होती.

गडचिरोलीचे जिल्हाधिकारी म्हणून काम केलेले संजय मीना आता नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त आहेत, तर पुण्याचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार यांची महाराष्ट्राचे साखर आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.

दरम्यान, मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईच्या आयुक्तांची निवड करण्याची जबाबदारी ही निवडणूक आयोगाव आहे. मुख्यमंत्री शिंदे यांना चहल यांची बदली करायची नव्हती. या साठि त्यांनी निवडणूक आयोगाला विनंती देखील केली होती. मात्र, आयोगाने त्यांची बदली केली.

मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी सामान्य प्रशासन विभागाला चहल आणि इतर आयुक्तांची बदली थांबवण्यासाठि निवडणूक आयोगाला दोन विनंती पत्रे पाठवले होते. मात्र त्यांची विनंती ही फेटाळण्यात आली.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर