मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; ट्रक-कारच्या धडकेत २ ठार

मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; ट्रक-कारच्या धडकेत २ ठार

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Jan 19, 2024 10:02 AM IST

Mumbai Pune Expressway Accident news : मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे.

Mumbai Pune Expressway Accident
Mumbai Pune Expressway Accident

Mumbai Pune Expressway Accident : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर ट्रक आणि कारची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला. अपघातात मृत्यू झालेले दोघेही विशीतील तरुण आहेत.

खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात घडला. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर एका आयशर टेम्पोनं (DD 01 N 9446) कारला मागील बाजूनं धडक दिली. अपघातात ट्रकच्या केबिनचा चक्काचूर झाला. यात टेम्पोचा चालक अनिल लाखन गावीत (वय २७ वर्षे) याचा जागीच मृत्यू झाला. तर, ड्रायव्हर सोबत केबिनमध्ये बसलेला अनिकेत बोरसा हा गंभीर जखमी झाला. मात्र, उपचाराआधीच त्याचा मृत्यू झाला. हे दोघेही दादर नगर हवेलीतील सिल्वासा येथील राहणारा होते.   

ज्या कारला पाठीमागून धडक बसली, त्या कारचा चालक घाबरून घटनास्थळावरून पळून गेला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. अपघाताची माहिती मिळताच आयआरबीचं गस्ती पथक, देवदूत यंत्रणा, मृत्युंजय देवदूत, बोरघाट वाहतूक पोलीस यंत्रणा व अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेची टीम घटनास्थळी पोहोचली. दोन्ही तरुणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी खोपोली नगरपालिका रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

weather Updates: महाराष्ट्र आणखी गारठणार! उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींमुळे राज्यातील तापमानात घट

ठाण्यात कंटेनरला आग लागून एक ठार

ठाणे शहरातील वर्दळीच्या घोडबंदर रोडवर कंटेनरला भीषण आग लागून एकाचा मृत्यू झाला आहे. या अपघातामुळं घोडबंदर रोडवरील वाहतूक ठप्प झाली होती. अपघातग्रस्त कंटेनर हटवल्यानंतर तब्बल ३ तासांनी हा मार्ग वाहतुकीसाठी खुला झाला. अपघातात मरण पावलेल्या व्यक्तीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

WhatsApp channel