Pune : पुण्यात विजेचा शॉक लागून तिघे ठार! डेक्कन परिसरातील पुलाची वाडी येथील घटना
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune : पुण्यात विजेचा शॉक लागून तिघे ठार! डेक्कन परिसरातील पुलाची वाडी येथील घटना

Pune : पुण्यात विजेचा शॉक लागून तिघे ठार! डेक्कन परिसरातील पुलाची वाडी येथील घटना

Published Jul 25, 2024 08:51 AM IST

Three died in Pune due to Electric shock : पुण्यात अंडा भुर्जीच्या गाडीवर आवराआवरी करण्यासाठी गेलेल्या तिघांचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना डेक्कन परिसरातील पूलाची वाडी येथे मंगळवारी रात्री घडली.

 पुण्यात विजेचा शॉक लागून तिघे ठार! डेक्कन परिसरातील पूलाचीवाडी येथील घटना
पुण्यात विजेचा शॉक लागून तिघे ठार! डेक्कन परिसरातील पूलाचीवाडी येथील घटना

Three died in Pune due to Electric shock : पुण्यात अंडा भुर्जीच्या गाडीवर आवराआवरी व ती सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी गेलेल्या तीन तरुणांचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना डेक्कन परिसरातील पूलाची वाडी येथे आज पहाटे ३ च्या सुमारास घडली.

अभिषेक अजय घाणेकर (वय २५, रा. पुलाच्या वाडी डेक्कन), आकाश विनायक माने (वय २१, रा. पूलाची वाडी डेक्कन, शिवा जिदबहादुर परिहार (वय १८, नेपाळी कामगार) अशी मृत्यूमुखी पडलेल्या तिघांची नावे आहेत. पुण्यात मंगळवारपासून जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे खकडवासला धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडले असून यामुळे मुठा नदीला मोठा पुर आला आहे. काल रात्री मोठा पाऊस आल्याने तिघांनी त्यांची अंडा भुर्जीची गाडी बंद करून घरी निघून गेले होते. दरम्यान, पहाटे ३ वाजता पाणी वाढल्याने ही गाडी सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी ते तिघेही पुन्हा गाडीवर गेले. यावेळी तेथे गुढघाभर पाणी साचले होते. यावेळी अचानक त्यांना विजेचा शॉक बसला. यामुळे तिघांचा जागीच मृत्यू झाला.

कशी झाली घटना

खडकवासला धरण परिसरात पाऊस झाल्याने धरणातून मोठा विसर्ग सोडण्यात आला आहे. यामुळे मूठ नदीला पुर आला आहे. पूलाची वाडी येथील नदी पात्राजवळ तिघांची अंडा भुर्जीची गाडी होती. काल रात्रीपासून पुण्यात जोरदार पाऊस सुरू असल्याने त्यांच्या गाडी शेजारी मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. यामुळे पहाटे ३ च्या सुमारास पाण्यातील गाडी काढण्यासाठी हे तिघेही गेले होते. यावेळी अचानक पाण्यात विद्युत प्रवाह उतरल्याने तिघांनाही विजेचा जोरदार झटका बसला. यामुळे तिघांचाही जागीच मृत्यू झाला. येथील वीज प्रवासह बंद करून तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. त्यांना सह्याद्री हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. मात्र, तिन्ही तरुणांना डॉक्टरांनी आज रोजी पाहते पाच वाजताच्या दरम्यान मृत घोषित केले आहे.

महावीतरणचे सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यात सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडी कोसळली आहेत. यामुले विद्युत तारा देखील काही ठिकाणी तुटल्या आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी विजेची उपकरणे काळजी पूर्वक हातळावी व तारा तुटलेल्या परिसरात व पाण्यात उतरू नये असे आवाहन महावितरणच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.

पुण्यात पावसाचा जोर वाढणार

पुण्यात पुढील काही तासांत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील काही तासांत पुण्यात व घाट विभात अतिवृष्टी सदृश्य पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीसाठी अग्निशामक दल आणि एनडीआरएफच्या तुकडीला देखील तैनात करण्यात आले आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर