मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मुंबईतील घाटकोपर भागात मोठा अपघात, भरधाव दुचाकीने पादचाऱ्यांना उडवले; ३ ठार

मुंबईतील घाटकोपर भागात मोठा अपघात, भरधाव दुचाकीने पादचाऱ्यांना उडवले; ३ ठार

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Mar 25, 2024 12:57 PM IST

Ghatkopar Accident : घाटकोपर (accident news) येथे आज सकाळी भीषण अपघात झाला. एका भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीस्वाराने पादचाऱ्याला उडवले. यात तिघे जण ठार झाले.

घाटकोपर (accident news) येथे आज सकाळी भीषण अपघात झाला. एका भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीस्वाराने पादचाऱ्यांना उडवले. यात तिघे जण ठार झाले.
घाटकोपर (accident news) येथे आज सकाळी भीषण अपघात झाला. एका भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीस्वाराने पादचाऱ्यांना उडवले. यात तिघे जण ठार झाले.

Three died in Ghatkopar Accident : घाटकोपर येथे आज सकाळी भीषण अपघात घडला. भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकी स्वाराने रस्त्यावरून जाणाऱ्या पादचाऱ्याला जोरदार धडक दिली. यात तिघे जण गंभीर जखमी झाले असून त्यांना दवाखान्यात नेले असताना डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. लालबहादूर शास्त्री नगर येथे साई हॉटेलसमोर ही घटना पहाटे घडली.

JP Nadda news : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या पत्नीची कार चोरीला, पोलीस तपास सुरू

समीर मुस्तफा (वय १९), मुजफ्फर बद्देशहा (वय १९) व पादचारी असलेली सुरेश (आडनाव समजू शकले नाही) असे मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार,

घाटकोपर येथे आज समीर नामक व्यक्ती हा पायी जात होता. येथील लालबहादूर शास्त्री नगर येथे साई हॉटेलसमोर असताना पाठीमागून आलेल्या एका भरधाव दुचाकीनं त्याला जोराची धडक दिली. त्यात तो गंभीर जखमी झाला. दुचाकीवर असलेले समीर मुस्तफा आणि मुजफ्फर बद्देशहा हे देखील जबर जखमी झाले. हा अपघात सीसीटीव्हीमध्ये टिपला गेला.

कुटुंबासमोर लैंगिक जीवनाबद्दल बोलणे, पतीला नपुंसक म्हणणे क्रूरता : उच्च न्यायालय

या घटनेनंतर स्थानिक नागिरकांनी तातडीने तिघांना जवळील घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासून त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. सध्या सीसीटीव्ही तसेच स्थानिकांच्या मदतीने अपघात कसा झाला याची माहिती पोलीस घेत आहेत. याशिवाय मृतांच्या कुटुंबियांची सुद्धा ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

काल, अमरावती येथे देखील मेळघाट येथे दुचाकीवरून जाणाऱ्या एका कुटुंबातील तिघांना कारने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला. यामुळे धारणी गावसह, घाटी गावावर शोककळा पसरली आहे.

IPL_Entry_Point