मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Accident : देवदर्शनासाठी जाणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; पाटस येथे भीषण अपघातात एकाच कुटूंबातील तिघे ठार

Pune Accident : देवदर्शनासाठी जाणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; पाटस येथे भीषण अपघातात एकाच कुटूंबातील तिघे ठार

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Dec 02, 2022 08:56 PM IST

Pune patas accident : पुणे जिल्ह्यातील पाटस येथे देवदर्शनासाठी जाणाऱ्या एका कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. पाटस अष्टविनायक मार्गावर दुचाकीला ट्रकने धडक दिल्याने पती, पत्नी आणि चिमुकल्याच्या मृत्यू झाला आहे.

पाटस येथे अपघातात ठार झालेले एकाच कुटुंबातील तिघे जण
पाटस येथे अपघातात ठार झालेले एकाच कुटुंबातील तिघे जण

पुणे: दौंड तालुक्यात दुचाकीवरून अष्टविनायकाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या एका कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. दौंड तालुक्यातील पाटस ते कारखाना या अष्टविनायक महामार्गावर ट्रक आणि दुचाकीच्या अपघात पती, पत्नी आणि त्याच्या मुलाचा मृत्यू झाला आहे.

संतोष सदाशिव साबळे, त्यांच्या पत्नी रोहिणी साबळे आणि त्यांचा चार वर्षांचा मुलगा गुरू साबळे अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या एकाच कुटुंबातील तिघांची नावे आहेत.

पाटस येथील रहिवासी संतोष साबळे हे आपल्या कुटुंबियांसोबत कुसेगाव येथील भानोबा देवाचे दर्शन घेऊन घरी परतत असताना पाटस येथील विश्वशांती बुद्ध विहार येथील कॅनॉलवरील गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या टाक मागून भरधाव येणाऱ्या ट्रकने साबळे यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याचे अपघात झाला. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. साबळे कुटुंबियांवर अचानकपणे काळाने झडप घातल्यामुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

कुसेगाव येथे देवदर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांची संख्या जास्त असते. तसेच रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनांचा वेग देखील जास्त असतो. यामुळे बया मार्गावर अपघातांची संख्या वाढली आहे.

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या