RSS meeting Pune : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बैठकीसाठी दोन शाळा, एका महाविद्यालयाला तीन दिवस सुट्टी
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  RSS meeting Pune : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बैठकीसाठी दोन शाळा, एका महाविद्यालयाला तीन दिवस सुट्टी

RSS meeting Pune : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बैठकीसाठी दोन शाळा, एका महाविद्यालयाला तीन दिवस सुट्टी

Published Sep 14, 2023 07:56 AM IST

RSS meeting Pune : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची राष्ट्रीय समन्वय बैठक पुण्यात १४ ते १६ सप्टेंबर या कालावधीत पार पडणार आहे. या बैठकीसाठी दोन शाळा आणि एका महाविद्यालयाला तीन दिवस सुट्टी देण्यात आली आहे.

RSS meeting Pune
RSS meeting Pune

पुणे : पुण्यात आज पासून पुढील तीन दिवस राष्ट्रीय स्वयंमसेवक संघाची राष्ट्रीय समन्वय बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक १४ ते १६ दरम्यान, एस. पी. कॉलेजच्या मैदानावर पार पडणार आहे. या साठी आरएसएसचे मोठे नेते पुण्यात दाखल होणार आहे. या बैठकीसाठी मोठा मंडप देखील उभारण्यात आला आहे. या परिसरातील दोन शाळा आणि एका महाविद्यालयाला तीन दिवस सुट्टी देण्यात आली आहे. या घटनेचा विद्यार्थी संघटनांनी विरोध केला आहे.

Maharashtra Weather update; राज्यात आज जोरदार पावसाचा इशारा; 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट, वाचा हवामानाचा अंदाज

पुण्यात होणाऱ्या या राष्ट्रीय समन्वय बैठक बैठकीला सरसंघचालक मोहन भागवत, सहकार्यवाह दत्तात्रय होसबाळे, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा उपस्थित राहणार आहेत. या बैतहिकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच खबरदरीचा उपाय म्हणून शिक्षण प्रसारक मंडळीच्या टिळक शिक्षणशास्त्र महाविद्यालय, एसपीएम इंग्रजी माध्यम शाळा आणि मूकबधीर शाळा यांना पुढच्या तीन दिवस सुटी देण्यात आली आहे.

मलबार हिल येथील अजंठा बंगला पाडून विधिमंडळाच्या सभापती, उपसभातींसाठी उभारणार १२ मजली सी व्ह्यू अपार्टमेंट

पुण्यात मोठ्या प्रमाणात इतर जागा उपलब्ध असतांना एस. पी. महाविद्यालयाच्या मैदानावर कार्यक्रम घेण्याचे कारण काय असा सवाल विद्यार्थी संघटनांनी केला आहे. संघाचा कार्यक्रम हा शासनाचा अधिकृत कार्यक्रम समजायचा का, असा प्रश्न स्टुडंट हेल्पिंग हँडच्या कुलदीप आंबेकर यांनी उपस्थित केला आहे. येत्या काही दिवसानंत गणेशोत्सवासाठी देखील सुट्टी दिली जाणार आहे. त्यात संघाच्या कार्यक्रमामुळे देखील सुट्टी दिली जाणार असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे, असे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस अक्षय जैन यांनी सांगितले.

दरम्यान, या बाबत शिक्षण प्रसारक मंडळचे नियामक मंडळ अध्यक्ष अ‍ॅड. एस. के. जैन म्हणाले, या बैतहिकीमुळे एसपीएम इंग्लिश मीडियम शाळा, मूकबधीर शाळेत जास्तीचे वर्ग घेऊन शैक्षणिक कामकाज पूर्ण करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. याची काळजी घेतली आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय समन्वय समितीची तीन दिवसीय बैठक आज पासून सुरू होणार आहे. देशातील सद्य:स्थितीतील सामाजिक-राजकीय आणि आर्थिक परिस्थिती, विविध ज्वलंत प्रश्नांवर या बैठकीत उहापोह केला जाणार आहे. तर भूज येथे नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या संघाच्या बैठकीत याबाबत अधिकृत निर्णय घेतला जाणार आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर