Nitin Gadkari Threat Call : भाजपाचे जेष्ठ नेते आणि केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्यामुळे खळबळ माजली होती. अज्ञातांनी नितीन गडकरी यांच्या नागपुरमधील जनसंपर्क कार्यालयात तीन वेळा फोन करून त्यांना ठार मारण्याची धमकी दिली होती. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केली असता हा फोन कॉल बेळगावमधून आल्याचे स्पष्ट झाले आहे. आरोपीला अटक करण्यासाठी नागपूर गुन्हे अन्वेषण पथक बेळगावकडे रवाना झाले आहे.
नितीन गडकरी यांना १०० कोटींची खंडणी मागत बॉम्बस्फोट घडविण्याची धमकी देणारा फोन कर्नाटकातील बेळगावमधून आला होता. त्यामुळे या धमकीला वेगळे वळण मिळाले आहे.
नितीन गडकरी यांच्या नागपुरातील जनसंपर्क कार्यालयात शनिवारी सकाळी तीन वेळा फोन आले होते. गडकरी यांच्याकडे १०० कोटी खंडणीची मागणी करण्यात आली होती. खंडणी न दिल्यास बॉम्बस्फोट करण्याची धमकी दिली होती. या प्रकारानंतर पोलिसी दलात खळबळ माजली होती. तपासाची चक्रे फिरल्यानंतर समजले की, हा फोन बेळगावमधून आला होता. नागपूर पोलीस कर्नाटक पोलिसांच्या मदतीने तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासणार आहेत.
संबंधित बातम्या