Narendra Modi : पंतप्रधान मोदींना बॉम्बने उडवण्याची धमकी, मुंबई पोलिसांना आलेल्या व्हाट्सअ‍ॅप मेसेजने खळबळ, तपास सुरू
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Narendra Modi : पंतप्रधान मोदींना बॉम्बने उडवण्याची धमकी, मुंबई पोलिसांना आलेल्या व्हाट्सअ‍ॅप मेसेजने खळबळ, तपास सुरू

Narendra Modi : पंतप्रधान मोदींना बॉम्बने उडवण्याची धमकी, मुंबई पोलिसांना आलेल्या व्हाट्सअ‍ॅप मेसेजने खळबळ, तपास सुरू

Dec 07, 2024 09:08 PM IST

Threat to PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी देणारा मेसेज मुंबई ट्रॅफिक पोलिसांना मिळाला आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांनी तपास सुरू केला आहे. नंबर तपासला असता तो राजस्थानचा असल्याचे निष्पन्न झाले. संशयिताला पकडण्यासाठी तेथे पथक पाठविण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PTI)

PM Narendra Modi death Threat : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची पुन्हा एकदा धमकी मिळाल्याने खळबळ माजली आहे. मुंबई वाहतूक पोलिसांच्या हेल्पलाइनवर शनिवारी आलेल्या या मेसेजमध्ये पाकिस्तानी गुप्तचर संस्थेचे (आयएसआय) दोन एजंट पंतप्रधान नरेंद्र मोदींना बॉम्बने उडवण्याचा कट रचत असल्याचे, लिहिण्यात आले होते. हा मेसेज मिळताच मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत.याबाबत मुंबई पोलिसांनी म्हटले की, ज्या नंबरवरून हा मेसेज आला, त्याचा तपास केला असता हा नंबर अजमेर राजस्थानचा असल्याचे समजले. संशयिताला पकडण्यासाठी पोलिसांचे एक पथक राजस्थानला रवाना झाले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी देणारा मेसेज मुंबई पोलिसांना आला आहे. मुंबई ट्रॅफिक पोलिसांच्या हेल्पलाइनवरील या मेसेजमध्ये लिहिलं होतं की, पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेचे (आयएसआय) दोन एजंट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बॉम्ब स्फोटात उडवण्याचा कट रचत आहेत. हा मेसेज मिळताच मुंबई पोलिसांचे पथक सतर्क झाले. धमकीच्या मेसेजबाबत पोलीस अधिकारी म्हणाले की, हा मेसेज कोणत्या नंबरवरून आला याची आम्ही चौकशी केली. हा नंबर राजस्थानमधील अजमेरचा असल्याची माहिती आम्हाला मिळाली. संशयिताला पकडण्यासाठी आमचे एक पथक तात्काळ राजस्थानला रवाना झाले.

आमच्या ट्रॅफिक कंट्रोल टीमच्या हेल्पलाइनवर पहाटे धमकीचा मेसेज आला. या मेसेजमध्ये आयएसआयच्या दोन एजंटांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचल्याची माहिती देण्यात आली होती. या मेसेजनुसार हे दोन्ही एजंट पंतप्रधान मोदींना बॉम्बने उडवण्याचा कट रचत आहेत.

धमकी देणारी व्यक्ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ किंवा दारूच्या नशेत असावी, असा संशय तपास अधिकाऱ्यांना आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. मात्र, भारतीय न्यायसंहितेच्या संबंधित कलमान्वये संबंधित व्यक्तीविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांच्या हेल्पलाइनवर यापूर्वीही अशा प्रकारचे धमकीचे फोन आणि मेसेज आले आहेत.

सलमान खानलाही आले आहेत धमक्यांचे मेसेज -

गेल्या दहा दिवसांत मुंबई पोलिसांना अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देणारे दोन मेसेज आले आहेत. सलमान खानला जिवंत राहायचे असेल तर त्याने बिष्णोई समाजाच्या मंदिरात जाऊन माफी मागावी आणि समाजासाठी ५ कोटी रुपयांची देणगी द्यावी, असे मेसेज शुक्रवारी आले होते. जर त्याने तसे केले नाही तर आम्ही त्याला लवकरच संपवू. बिश्नोई टोळी अजूनही सक्रीय आहे.

सलमान खानला बिश्नोई टोळीकडून यापूर्वीच धमक्या आल्या आहेत. या धमक्या फारशा गंभीर नाहीत, पण आम्ही त्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. आमच्या टीमने अभिनेत्याची सुरक्षा वाढवली आहे. ते म्हणाले की, सायबर क्राइमची टीम मेसेज ट्रेस करण्याचा प्रयत्न करत आहे. मेसेज पाठवणारी व्यक्ती खरंच बिश्नोई टोळीशी संबंधित आहे की केवळ गंमत म्हणून मेसेज पाठवली याचाही आम्ही शोध घेत आहोत.

Whats_app_banner
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर