…तर तुमचा बाबा सिद्दीकी करणार! सीएम योगींच्या हत्येची मुंबई पोलिसांना मिळाली धमकी; १० दिवसांत राजीनाम्याची मागणी
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  …तर तुमचा बाबा सिद्दीकी करणार! सीएम योगींच्या हत्येची मुंबई पोलिसांना मिळाली धमकी; १० दिवसांत राजीनाम्याची मागणी

…तर तुमचा बाबा सिद्दीकी करणार! सीएम योगींच्या हत्येची मुंबई पोलिसांना मिळाली धमकी; १० दिवसांत राजीनाम्याची मागणी

Nov 03, 2024 10:56 AM IST

threat for yogi adityanath : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना मुंबई पोलिसांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. एका अनोळखी क्रमांकावरून ही धमकी देण्यात आली आहे.

…तर तुमचा बाबा सिद्दीकी करणार! सीएम योगींची हत्या करण्याची मुंबई पोलिसांना मिळाली धमकी; १० दिवसांत राजीनाम्याची मागणी
…तर तुमचा बाबा सिद्दीकी करणार! सीएम योगींची हत्या करण्याची मुंबई पोलिसांना मिळाली धमकी; १० दिवसांत राजीनाम्याची मागणी

threat for yogi adityanath mumbai police get message :  राज्यात सध्या विधासभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. निवडणूक प्रचाराचा धुरळा उडत असतांना उमेदवारांच्या प्रचारासाठी  भाजप, काँग्रेससह अनेक दिग्गज नेते राज्यात उपस्थित राहणार आहे. भाजपच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि  उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ येणार आहे. मात्र, त्यापूर्वीच मुख्यमंत्री आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला ही धमकी देण्यात आली आहे.  योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अन्यथा त्याचा बाबा सिद्दिकी करू अशी धमकी देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. 

राज्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना मुंबई पोलिसांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. योगी आदित्यनाथ यांनी दहा दिवसांत राजीनामा दिला नाही तर त्यांची  बाबा सिद्दीकींसारखे हत्या करू असे धमकी देणाऱ्या व्यक्तीने म्हटले आहे. मुंबई पोलिसांच्या ट्रॅफिक कंट्रोल सेलला शनिवारी संध्याकाळी हा धमकीचा मेसेज मिळाला. मात्र ही धमकी कोणी दिली हे समजू शकलेले नाही. कारण हा मेसेज एका अनोळखी नंबरवरून आला आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान, ही धमकी  मिळाल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. १२ ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे  नेते बाबा सिद्दीकी यांची त्यांचा मुलगा जीशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येत लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सहभाग असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी पोलीस तपास करत असून य याप्रकरणी अनेकांना अटक करण्यात आली आहे. 

विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांत ५०० राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांना बॉम्बस्फोटाच्या धमक्या आल्या आहेत. अवघ्या दोन आठवड्यांत हा प्रकार घडला आहे. त्यामुळे अनेक उड्डाणांवरही परिणाम झाला आहे. तपसानंतर  सुरक्षा यंत्रणांनी या धमक्या खोट्या असल्याचं म्हटलं होतं. सोशल मीडियाच्या माध्यमातून या धमक्या देण्यात आल्या होत्या. 

नंदुरबारमध्ये भरधाव बोलेरोने रस्त्याच्या कडेला दुचाकींवर असलेल्यांना चिरडले! भयावह अपघातात पाच ठार, काही जखमी

अलीकडेच सलमान खानला धमकी देणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. या व्यक्तीने अभिनेत्याकडे दोन कोटी रुपयांची मागणी केली. मिळालेल्या माहितीनुसार, आझम मोहम्मद मुस्तफा असं या व्यक्तीचं नाव आहे. तो मुंबईतील वांद्रे पूर्व येथील रहिवासी आहे. त्याचप्रमाणे नोएडामध्ये एका २० वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. या व्यक्तीने सलमान खान आणि बाबा सिद्दीकी यांचा मुलगा जीशानला धमकी दिली. मोहम्मद तैय्यब असे या व्यक्तीचे नाव आहे.

योगी आदित्यनाथ यांचा राज्यात प्रचार दौरा 

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे विधानसभा निवडणूक प्रचारासाठी महाराष्ट्र येणार असून त्यांच्या राज्यात अनेक ठिकाणी  प्रचार सभा होणार आहेत. मुंबईसह अनेक ठिकाणी योगी आदित्यनाथ हे जाहीर सभा घेणार आहेत.  मात्र, त्यापूर्वीच  मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी आल्याने त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.  धमकी देणाऱ्याने योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, नाही तर त्यांना  बाबा सिद्दिकी प्रमाणे संपवू अशी धमकी मेसेज द्वारे देण्यात आली आहे. मुंबई पोलिस हा मेसेज पाठवणाऱ्याचा शोध घेत आहेत. 

 

Whats_app_banner