मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ashish Shelar: 'ठाकरे कुटुंबीयांच्या संपत्तीच्या विरोधात याचिका हा मराठी माणसानं केलेला उठाव'
Rashmi Thackeray - Uddahv Thackeray
Rashmi Thackeray - Uddahv Thackeray

Ashish Shelar: 'ठाकरे कुटुंबीयांच्या संपत्तीच्या विरोधात याचिका हा मराठी माणसानं केलेला उठाव'

20 October 2022, 17:38 ISTGanesh Pandurang Kadam

Ashish Shelar attacks Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे कुटुंबीयांच्या मालमत्तेविरोधात कोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर भाजपनं पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Ashish Shelar on Thackeray Family Property: शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व त्यांच्या कुटुंबीयांच्या विरोधात मुंबईतील वकील गौरी भिडे यांनी याचिका दाखल केली आहे. ठाकरे कुटुंबीयांकडं बेहिशेबी मालमत्ता आहे, असा आरोप त्यांनी केला असून चौकशीची मागणी केली आहे. त्यावर भारतीय जनता पक्षानं आज प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी आजच्या पत्रकार परिषदेत बोलताना ठाकरे यांच्या विरोधातील याचिकेवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी न्यायालयीन प्रक्रियेवर काही बोलण्यास नकार दिला. मात्र, ठाकरे कुटुंबावर टीकेची संधी त्यांनी सोडली नाही. ‘उद्धव ठाकरे यांच्या संपत्तीची चौकशी होईल की नाही, हा विषय न्यायालयाचा आहे. मी न्यायालयीन प्रकरणावर कधीही भाष्य करत नाही, असं ते म्हणाले. मात्र, 'उद्धव ठाकरेंच्या विरोधात न्यायालयात दावा करणारी व्यक्ती ही त्यांची शेजारी आहे. ते मराठी असून मुंबईकर आहेत. उद्धव ठाकरेंच्या विरोधात शेजाऱ्यानंच केलेली याचिका हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या विरोधात मराठी माणूस आणि मुंबकरांनी केलेलं बंड आणि उठाव आहे, असं शेलार म्हणाले.

आदित्य ठाकरे यांच्यावर शेलक्या शब्दांत टीका

आशिष शेलार यांनी यावेळी वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर शेलक्या शब्दांत टीका केली. वरळीतील जांबोरी मैदानात भाजप गेल्या काही दिवसांपासून विविध कार्यक्रम आयोजित करत आहे. याबाबत विचारलं असता, 'भाजपचे कार्यक्रम होत आहेत, कारण मुंबईकरांशी आमची नाळ जोडलेली आहे. मुंबईकरांच्या मनात काय आहे, हे आम्हाला कळतं. जे टीका करतायत त्यांना मुंबईकारांशी काही घेणे देणे नाही. खासकरून वरळीच्या आमदारांना पेग, पेग्विन आणि पार्टी याशिवाय काहीच दिसत नाही. वरळीच्या आमदारांनी मराठी साहित्य, संस्कृती, लोककला यावर केलेला एक कार्यक्रम दाखवावा, असं आव्हानच शेलार यांनी दिलं.