मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pimpri-chinchwad suicide : अभ्यास करण्यावरून आईने रागावले! पिंपरी-चिंचवडमध्ये १३ वर्षांच्या मुलाने उचलले टोकाचे पाऊल

Pimpri-chinchwad suicide : अभ्यास करण्यावरून आईने रागावले! पिंपरी-चिंचवडमध्ये १३ वर्षांच्या मुलाने उचलले टोकाचे पाऊल

Feb 03, 2024 08:02 AM IST

Pimpri-chinchwad suicide : पिंपरी- चिंचवडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. आईने अभ्यास करण्यासाठी रागावल्याने एका १३ वर्षांच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली.

Pune Crime news
Pune Crime news

Pimpri-chinchwad suicide : पिंपरी- चिंचवडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. आईने अभ्यास करण्यासाठी रागावल्याने एका १३ वर्षांच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मुलाच्या या निर्णयामुळे कुटुंबाला देखील जबर हादरा बसला आहे.

Raj Thackeray: वाहतूक कोंडी पाहून राज ठाकरे संतापले; यावेळी ठाणे- मुलुंड टेालनाक्यावर...

जतीन सोमनाथ कुदळे (वय १३) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. तो इयत्ता आठवीत शिक्षण घेत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जतीन हा अभ्यास करत नव्हता. या साठी त्याची आई त्याला वारंवार रागवत होती. मात्र, जतिन काही केल्या ऐकत नव्हता. ३१ जानेवारीला देखील जतिन अभ्यास करत नसल्याने त्याची आई त्याला रागावली. यानंतर त्याची आई मुलीला ट्यूशनला सोडायला गेली. यावेळी जतिन घरी एकटा असतांना त्याने घराचा दरवाजा बंद करून गळफास घेतला. दरम्यान, त्याच वेळी तयाचे वडील घरी आले. त्यांनी दरवाजा वाजवला मात्र, कुणी दरवाजा उघडला नाही.

Land Dispute Murder: जमिनीच्या वादातून गेल्या ५ वर्षात ३ हजार २४७ जणांची हत्या

यामुळे त्यांनी पाठीमागील दरवाजाच्या फटीतून पहिले असता जतिनने गळफास घेतला असून त्याचे पाय जमिनीला असल्याचे दिसले. त्यांनी तातडीने दरवाजाच्या आतून हात घालून कडी उघडली. त्याचा फास सोडवत त्याला महानगर पालिकेच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान जतीनचा मृत्यू झाला.

ट्रेंडिंग न्यूज

आजची पिढी मोबाइलच्या आहारी गेली आहे. मोबाइलमुळे त्यांच्या विचार करण्याच्या क्षमतेवरी मोठा परिमाण झाला आहे. यातुन जर आई वडील रागावले तर, आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलणाच्या घटनाही वाढल्या आहेत.

WhatsApp channel
विभाग