Pimpri chinchwad Crime : चोरीसाठी थेट विमान प्रवास! दिल्लीत जाऊन चोरायचे आलीशान गाड्या; पोलिस कर्मचाऱ्यांसह चौघांना अटक-thieves steal luxury cars in delhi by travel in flight four arrested including policeman ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pimpri chinchwad Crime : चोरीसाठी थेट विमान प्रवास! दिल्लीत जाऊन चोरायचे आलीशान गाड्या; पोलिस कर्मचाऱ्यांसह चौघांना अटक

Pimpri chinchwad Crime : चोरीसाठी थेट विमान प्रवास! दिल्लीत जाऊन चोरायचे आलीशान गाड्या; पोलिस कर्मचाऱ्यांसह चौघांना अटक

Jan 13, 2024 06:22 AM IST

Pune Pimpri chinchwad Crime : पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आलीशान कार चोरणारी आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला आहे. आरोपी हे पुण्यातून विमानाने दिल्लीला जात आलीशान गाड्यांची चोरी करत होते.

Pune Pimrpi chinchwad Crime
Pune Pimrpi chinchwad Crime

Pune Pimrpi chinchwad Crime : पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला आहे. ही टोळी गाड्या चोरण्यासाठी विमानातून दिल्लीला जायचे. तसेच तेथून आलीशान गाड्या चोरून त्या राज्यात आणून बनावट कागद पत्रांनी विकायचे. या टोळीची माहिती मिळताच पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. पोलिसांनी चौघांना अटक केली असून यात सांगली जिल्ह्यातील एका पोलिसाचा देखील समावेश आहे. त्यांच्याकडून तब्बल १ कोटी ५७ लाख रुपयांच्या ११ गाड्या देखील जप्त केल्या आहेत.

Ram Mandir : “अयोध्येत राम मंदिर होणार हे तर नियतीने…”, मंदिराच्या उद्घाटनापूर्वीच लालकृष्ण आडवाणींचं मोठं वक्तव्य

अजीम सलीम पठाण, शशीकांत प्रताष काकडे, राजराम उर्फ राजू तुकाराम खेडेकर, महेश भीमाशंकर सासवे, प्रशांत माने, विकास माने, भरत खोडकर, हाफिज, इलियास आणि रसूल शेख अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नाव आहे. यातील आरोपी भरत खोडकर हा सांगली जिल्ह्यात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहेत. तो चोरलेल्या गाड्या विकण्यासाठी मदत करत होता.

PM Narendra Modi swag: मुंबई ट्रान्स हार्बर लिंक उद्घाटनात पंतप्रधान मोदींचा खास स्वॅग; फोटो झाले व्हायरल!

आरोपी अजीम सलीम पठाण हा त्याचा साथीदार शशिकांत काकडे याच्या सोबत विमानाने दिल्लीला जात होता. येथे तो त्याच्या सहकाऱ्यासह आलीशान गाड्या चोरायचे. ही वाहने ती राज्यात आणून बनावट कागदपत्रे तयार करून विकत होते. दरम्यान, चाकणमध्ये एक वाहनचोरीचा गुन्हा दाखल झाला होता. पोलिस या चोरीचा तपास करत होते. तेव्हा त्यांना या टोळीची माहिती मिळाली. त्यांनी अजीम सलीम पठाण याला अटक केली.

त्याला पोलिसी हिसका दाखवताच त्याने त्याचा साथीदार शशिकांत काकडे याचे नाव सांगितते. तसेच दोघेही बाहेरील राज्यात जाऊन आलीशान गाड्या चोरत असल्याचे त्यांनी सांगितले. यात त्यांना त्यांचे इतर साथीदार मदत करायचे. यात पोलिस शिपाई देखील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी दहापैकी ४ जणांना दरोडा विरोधी पथकाने अटक केली आहे. ही कारवाई दरोडा विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

विभाग