Navi Mumbai Crime : नवी मुंबईत सराफा दुकानावर फिल्मी स्टाइल दरोडा; बंदुकीच्या धाकावर सोन्याचं दुकानं लुटलं
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Navi Mumbai Crime : नवी मुंबईत सराफा दुकानावर फिल्मी स्टाइल दरोडा; बंदुकीच्या धाकावर सोन्याचं दुकानं लुटलं

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत सराफा दुकानावर फिल्मी स्टाइल दरोडा; बंदुकीच्या धाकावर सोन्याचं दुकानं लुटलं

Published Jul 29, 2024 12:22 PM IST

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत काही दरोडे खोरांनी एका सोन्याचांदीच्या दुकांनावर दरोडा घातला आहे. त्यांनी बंदुकीचा धाक दाखवत दुकान लुटले आहे.

नवी मुंबईत सराफा दुकानावर फिल्मी स्टाइल दरोडा; बंदुकीच्या धाकावर सोन्याचं दुकानं लुटलं
नवी मुंबईत सराफा दुकानावर फिल्मी स्टाइल दरोडा; बंदुकीच्या धाकावर सोन्याचं दुकानं लुटलं

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत एका सराफी दुकानात काही दरोडेखोरांनी दरोडा टाकला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवत व हवेत गोळीबार करत दुकानातील सोन्याचांदीचे दागिने लंपास केले. या घटनेचा सीसीटीव्ही व्हायरल झाले असून पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत. ही घटना रवीवारी रात्री खारघर सेक्टर ३५ येथील बीएम ज्वेलर्स दुकानात घडली.

मिळेलयं माहितीनुसार नवी मुंबईतील खारघरमध्ये दरोडेखोरांनी फिल्मी स्टाइल दरोडा टाकत सोन्याचे दुकांन लुटले खारघर सेक्टर ३५ येथे बीएम ज्वेलर्सवरचे दुकान आहे. या ठिकाणी रविवारी रात्री ११ च्या सुमारास तीन दरोडेखोर दुकानात घुसले. त्यांच्या डोक्यात हेल्मेट होते. तर हातात बंदूक होती. त्यातील एकाने दुकानातील कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवला. व दुकानातील माल त्यांनी आणलेल्या बॅगेत भरण्यास सांगितला. यानंतर त्यांनी हवेत गोळीबार करत पळ काढला. दरोड्याची ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या घटनेमुळे या परिसरातील व्यावसायीकांमध्ये घबराट पसरली आहे. या घटनेची माहिती मिळताच खारघर पोलीसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पंचनामा केला असून दुकानातील सीसिटीव्ही ताब्यात घेतले आहे. या आधारावर पोलिसांनी दरोडेखोरांचा तपास करण्यासाठी पथकाची स्थापना केली असून फरार चोरट्यांचा शोध घेण्यासाठी ही पथके रवाना करण्यात आली आहे.

तीन हल्लेखोरांनी दुकानात शिरून पिस्तुलाच दाखवला धाक

दरोडेखोर अचानक दुकानात शिरले. यावेळी दुकानातील कर्मचारी हे आवराआवर करत होते. यावेळी अचानक तिघे दरोडेखोर दुकानात शिरले. त्यांनी कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी देत दुकान लुटले. दुकानातील एका कर्मचाऱ्याने सिक्युरिटी अर्लाम वाजवण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरट्यांनी त्याला मारहाण केली. यानंतर त्यांनी हवेत गोळीबार करत दुकानातून पळ काढला.

या घटनेमुळे परीरात दहशतीचे वातावरण आहे. स्थानिक नागरिक आणि व्यापरी भयभीत असून पोलिसांनी दरोडेखोरांना पडकुन  त्यांना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे. तसेच या  परिसरात भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी येथे पोलिसांची गस्त वाढवावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर