Saif Ali khan stabbed by the intruder : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री करीना कपूर यांच्या वांद्रे पश्चिमयेथील घरात गुरुवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास चोरी झाली. चोरीदरम्यान सैफ अली खानवर चोरट्याने चाकूने हल्ला केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात सैफ अली खान जखमी झाला असून त्याला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
ही घटना गुरुवारी पहाटे २:३० च्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार चोरट्याशी झालेल्या झटापटीत अभिनेता सैफ अली खानवर चाकूने वार करण्यात आले. यात सैफ अली खान जखमी झाला आहे. त्याला किती मार लागला हे समजू शकलेले नाही. मुंबई पोलीस आणि गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करत आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वांद्रे पोलिसांनी एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून आरोपींना पकडण्यासाठी अनेक पथके तयार करण्यात आली आहेत. करीना कपूर आणि तिची मुले सुखरूप आहेत. कुटुंबीयांनी अद्याप या घटनेबाबत कोणतेही अधिकृत माहिती दिलेले नाही. प्राथमिक तपासानंतर पोलीस लवकरच या प्रकरणाची सविस्तर माहिती देऊ शकतात. घराच्या आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे.
ही घटना घडली तेव्हा अभिनेता सेफ अली खान, करीना आणि कुटुंबातील इतर सदस्य झोपले होते. यावेळी चोरटा घरी शिरला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरट्याने सैफ अली खानवर चाकूने वार केले. दोघांमध्ये झटापट झाली. मोठा आवाज झाल्यामुळे घरच्यांना जाग आली. यावेळी चोरट्याने घटनास्थळावरून पळ काढला. पोलीस आता त्याचा शोध घेत आहेत.
एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यानेया घटनेला दुजोरा दिला आहे. या बाबत माहिती देतांना अधिकाऱ्याने सांगितलं की, सैफ अली खानला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या ठिकाणी त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरोडेखोराशी झालेल्या झटापटीत त्याच्यावर चोरट्यांनी चाकूने वार केले आहे. यात तो जखमी झाला आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. आम्ही या प्रकरणाची चौकशी करत आहोत. मुंबई गुन्हे शाखा देखील या घटनेचा समांतर तपास करत आहे.
लीलावती रुग्णालयाचे सीओओ डॉ. निरज उत्तमणी यांनी सांगितले की, सैफवर त्याच्या घरात एका अज्ञात व्यक्तीने हल्ला केला. त्याला पहाटे ३.३० वाजता लीलावती रुग्णालयात आणण्यात आले. त्याला सहा जखमा आहेत, ज्यापैकी दोन गंभीर आहेत. एक जखम त्यांच्या मणक्याजवळ आहे. आम्ही त्यांच्यावर शस्त्रक्रिया करत आहोत. त्यांच्यावर न्यूरोसर्जन नितीन डांगे, कॉस्मेटिक सर्जन लीना जैन भूलतज्ज्ञ निशा गांधी शस्त्रक्रिया करत आहेत. शस्त्रक्रिया झाल्यानंतरच आम्हाला किती नुकसान झाले आहे हे कळेल, असे डॉ. उत्तममणी म्हणाले.
संबंधित बातम्या