Maharashtra weather Update: राज्याच्या तापमानात मोठी वाढ होणार आहे. उष्णतेची लाट येणार असून विदर्भासह, पुणे आणि मुंबईत मोठ्या प्रमाणात तापमान वाढणार आहे. प्रामुख्याने मध्य महाराष्ट्र, कोकण गोवा, आणि विदर्भात तापमानात वाढण्याची शक्यता आहे. पुण्यात देखील कमाल तापमानात वाढ होणार असून भेर पडतांना नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्यात सध्या हवामान कोरडे असून २८ मार्च नंतर पश्चिमी विक्षोभ सक्रिय होण्याचा अंदाज पुणे वेध शाळेने वर्तवला आहे.
पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार, राज्यावर आज कोणतीही हवामानाची यंत्रणा कार्यरत नाही. एक द्रोणीका रेषा म्हणजेच हवेची विसंगती विदर्भातील उत्तर कर्नाटकातील अंतर्गत भागापर्यंत जात आहे. याचा परिणाम राज्याच्या हवामानावर होणार आहे. पुढील २४ तासात राज्याच्या उत्तरी भागात आद्राता जास्त राहणार आहे. त्यामुळे वातावरण ढगाळ राहील. पुढील २७ मार्चपर्यंत आकाश निरभ्र राहणार आहे. २८ मार्चनंतर एक पश्चिमी विक्षोभ म्हणजेच वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय होणार आहे. यामुळे २९ आणि ३० तारखेला राज्यात विशेषत: उत्तरी मध्य भागात आकाश अंशत: ढगाळ राहणार आहे. किमान तापमानात जास्त बदल होणार नाही. तर कमाल तापमानात २७ मार्चपर्यंत किंचित वाढ होण्याची शक्यता आहे.
पुणे आणि परिसरात आकाश अंशत: ढगाळ राहील. उद्या पासून आकाश निरभ्र राहील. उद्यापासून आकाश अंशत: ढगळ राहील किमान तापमानात जास्त बदल होणार नाही मात्र, २७ मार्च नंतर कमाल तापमानात १ ते २ डिग्री सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. पुण्यात रविवारी कमाल हे ३७.७ डिग्री सेल्सिअस होते. तर कमाल तापमान २१ डिग्री सेल्सिअस होते. या तापमानात आणखी वाढ होणार असल्याने पुणे महागर पालिकेतर्फे नागरिकांना बाहेर पडतांना विशेष काळजी घेण्याची आवाहन करण्यात आले आहे. २७ मार्च पर्यंत कोकणातील काही भागांमध्ये उष्ण आणि दमट हवामान रहाणार आहे.
पुण्यासह मुंबईतही तापमान वाढीची शक्यता आहे. पुढील २४ तासात मुंबई शहर आणि उपनगरांत आकाश मुख्यतः निरभ्र राहणार असून कमाल आणि किमान तापमान वाढ होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार मार्च महिन्यात तापमानात वाढ होणार असून दिवसा आणि रात्रीच्या तापमानात देखील वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबईत रविवारी ३०.८ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर सांताक्रूझ येथे ४० डिग्री सेल्सिअस तपमाची नोंद झाली.
राज्यात मालेगाव सर्वाधिक उष्ण आहे. रविवारी येथील तापमान ४०.८ डिग्री सेल्सिअस नोंदवल्या गेले. त्या पाठोपाठ सोलापूर ४० डिग्री सेल्सिअस, सांगली आणि सातारा ३८ डिग्री सेल्सिअस, उस्मानाबाद ३८.८ डिग्री सेल्सिअस, संभाजीनगर ३७.८, परभणी ३९.५ डिग्री सेल्सिअस, नांदेड ३९.२ डिग्री सेल्सिअस तापमानात नोंदवल्या गेले.
विदर्भात अकोला ४०. ५ डिग्री सेल्सिअस, अमरावती ३९.४ डिग्री सेल्सिअस, बुलढाणा ३७.६, चंद्रपूर ३८.८ डिग्री सेल्सिअस, गोंदिया ३७.५ डिग्री सेल्सिअस, नागपूर ३९.२ डिग्री सेल्सिअस, वर्धा ३९.९ डिग्री सेल्सिअस, तर यवतमाळ येथे ४०.२ डिग्री सेलियास तापमानाची नोंद झाली.