statue of unity road collapse : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण येथे उभारण्यात आलेला शिवाजी महाराजांचा पुतळा वाऱ्यामुळे कोसळला. या घटनेवरून वाद सुरू असतांना गुजरात मधील बडोदा येथे स्टॅच्यू ऑफ युनिटीकडे जाणारा मुख्य रस्ता पावसामुळे व येथे आलेल्या पुराच्या पाण्यामुळे उखडला आहे. या मार्गावर आता केवळ एकरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे या रस्त्याच्या कामाबद्दल देखील आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहेत.
बडोदा येथे सरदार वल्लभ भाई पटेल यांचा मोठा पुतळा उभरण्यात आला आहे. या पुतळ्याला असे नाव देण्यात आले आहे. या पुतळ्यापर्यंत जाण्यासाठीस्टॅच्यू ऑफ युनिटी मुख्य रस्ता तयार करण्यात आला आहे. हा रस्ता पुराच्या पाण्यात तुटून गेला आहे. डॅमच्या पाण्यामुळे हा रस्ता तुटून गेला आहे. पाण्यामुळे रस्त्याचे मोठे नुकसान झाले असून हा रस्ता दुरुस्त करण्यासाठी अनेक महिन्यांचा कालावधी लागू शकतो. पुस कमी झाल्यावर हा रस्ता पुन्हा नव्याने बांधवा लागणार आहे.
सरदार वल्लभ भाई पटेल यांचा मोठा पुतळा उभरण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री असताना केली होती. सरदार वल्लभ भाई पटेल यांना लोह पुरूष संबोधले जात असल्याने तसेच त्यांच्या कार्याला उजळा देण्यासाठी पटेल यांच्या पुतळ्याचा २०१३ मध्ये शिलान्यास करण्यात आला होता. हा पुतळा २०१८ मध्ये पूर्ण झाला. या पुतळ्याची नोंद जगातील सर्वात मोठा पुतळा अशी करण्यात आली. या साठी तब्बल २ हजार ९८९ कोटी रुपये खर्च करण्यात आले. हा पुतळा पाहण्यासाठी देशातील आणि जगभरातील नागरिक या ठिकाणी भेट देत आहेत. यामुळे येथे रोजगार निर्मिती देखील झाले आहे.
सध्या गुजरातमध्ये पावसाने कहर केला आहे. पावसामुळे आतापर्यंत २९ जणांचा मृत्यू झाला आहे. सर्व नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. हवामान खात्याने मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे गुजरातमधील ११ जिल्ह्यांमध्ये पावसाचा रेड अलर्ट तर २२ जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे. गुजरातमधील १३ जिल्ह्यांमध्ये २४ तासात २०० मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली असून काही जिल्ह्यांमध्ये बचाव कार्यासाठी लष्कर तैनात करण्यात आले आहे. बडोदा येथे झालेल्या पावसामुळे स्टॅच्यू ऑफ युनिटीला रस्ता तुटल्याकमुळे या कामाची पोलखोल झाली आहे.