gangster sharad mohol murderer arrested : कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर कोथरुड परिसरातील सुतारदरा येथे शुक्रवारी दुपारी गोळीबार करण्यात आला होता. अज्ञात आरोपींनी शरद मोहोळ याच्यावर चार गोळ्या झाडत त्याची हत्या केली. दरम्यान, साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर (रा, सुतारदरा, कोथरूड) याने आपल्या साथीदारांच्या मदतीने मोहोळवर गोळीबार केल्याचे स्पष्ट झाले असून पुणे पोलिसांनी शुक्रवारी रात्री ९ पथकांच्या साह्याने मारेकऱ्यांना सीने स्टाइलने पुणे सातारा महामार्गावर अटक केली. तब्बल ८ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
शरद मोहोळ पुण्यातील कुख्यात गुंड असून त्याच्यावर हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरण यासारखे अनेक गुन्हे नोंद आहेत. शरद मोहोळ यांची हिंदू गुंड म्हणून ओळख निर्माण झाली होती. दरम्यान, काल शुक्रवारी त्याच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी मंदिरात जात असतांना त्याला त्याच्यावर गोळीबार करण्यात आला होता. यात तो गंभीर झाला होता. दरम्यान, उपचारा दरम्यान, त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे पुण्यात तानावाचे वातावरण होते. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून आरोपींना अटक करण्यासाठी तातडीने ९ पथके तयार केली. गुन्हे शाखेचे अधिकारी घटना घडल्यापासून आरोपींच्या शोधात होते. दरम्यान, साहील उर्फ मुन्ना संतोष पोळेकर यांनी शरद मोहोळ याची हत्या केल्याचे निष्पन्न झल्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
यानंतर आरोपीचा माग घेण्यासाठी ९ पथकांची स्थपना करून त्यांच्या शोध घेण्यासाठी हे पथकं पुणे ग्रामीण भाग, सातारा, आणि कोल्हापूरकडे रवना झाले. आरोपी हे पुणे सातारा मार्गावरील शिरवळ येथे लपले असल्याची माहिती गुन्हेशाखेच्या पथकाला मिळाली. आरोपी हे एका स्विफ्ट गाडीत असल्याची माहिती देखील पोलिसांना मिळाली,. पोलिसांनी सीने स्टाइल या गाडीचा पाठलाग केला. पोलिसांनी आरोपींना अखेर अटक केली. तब्बल ८ जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ३ पिस्टल, ३ मॅगझीन, ५ राऊंड आणि २ चारचाकी गाड्या पोलिसांनी ताब्यात घेतल्या.
या प्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात रजि क्रं २/२३ कलम ३०२,३०७,३४ IPC सह भारतीय हत्यार कायदा कलम ३.२५, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१),(३)सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा हा शरद मोहोळ बरोबर असलेल्या जमिनीच्या /पैशाच्या जुन्या वादातुन आरोपीनी केला असल्याचे प्रथम दर्शी तपासात निष्पन्न झाले आहे. ही कामगिरी पुणे शहर गुन्हे शाखेने कारवाई करून घटनास्थळी गोळीबार करणाऱ्या व त्यांना मदत करणाऱ्या आरोपीना ताब्यात घेतले. मुठा खोऱ्यातील गुन्हेगारी वर्चस्ववादातून शरद मोहोळ याची हत्या झाल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. नामदेव कानगुडे हा या हत्येचा मास्टरमाईंड असून अतिशय नियोजनबध्द पद्धतीने मुन्ना पोळेकर याच्यासह दोन जणांनाच्या साह्याने शरद मोहोळ याची हत्या केली. पुण्याच्या वैकुंठ स्मशानभूमीत मोहोळ याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
संबंधित बातम्या