Maharashtra Weather Update : राज्यात पावसाचा जोर ओसरला! 'या' जिल्ह्यांना IMD ने दिला यलो अलर्ट
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Weather Update : राज्यात पावसाचा जोर ओसरला! 'या' जिल्ह्यांना IMD ने दिला यलो अलर्ट

Maharashtra Weather Update : राज्यात पावसाचा जोर ओसरला! 'या' जिल्ह्यांना IMD ने दिला यलो अलर्ट

Jul 29, 2024 06:58 AM IST

Maharashtra Weather Update : राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे. कोकणात, मध्य महाराष्ट्रात काही जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.

राज्यात पावसाचा जोर ओसरला! 'या' जिल्ह्यांना IMD ने दिला यलो अलर्ट
राज्यात पावसाचा जोर ओसरला! 'या' जिल्ह्यांना IMD ने दिला यलो अलर्ट (Hindustan Times)

Maharashtra Weather Update : राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे. कोकणात, मध्य महाराष्ट्रात काही जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या ठिकाणी हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाने जारी केलेल्या अंदाजानुसार आज ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, विदर्भातील अमरावती जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. या ठिकाणी आज हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार समुद्र सपाटीवरील कमी दाबाचा पट्टा दक्षिण गुजरात ते उत्तर केरळ किनारपट्टी पर्यंत आहे. आज २९ जुलै रोजी कोकणात बहुतांश ठिकाणी तर विदर्भात बऱ्याच, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. आज रायगड जिल्हा तसेच पुणे व सातारा जिल्ह्याच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी खूप जोरदार पावसाची शक्यता असल्याने तसेच अमरावती वर्धा व नागपूर जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह खूप जोरदार पाऊस पडण्याची दाट शक्यता असल्याने वरील सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

ठाणे. मुंबई, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, अकोला, भंडारा, चंद्रपूर जिल्ह्यांना उद्यापासून पुढील तीन ते चार दिवस तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, तसेच पुणे सातारा व कोल्हापूर जिल्ह्याच्या घाट क्षेत्रामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार ते खूप जोरदार पावसाची शक्यता असल्याने या ठिकाणी यलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भात ३० व ३१ जुलैला बहुतांश जिल्ह्यात तर एक ऑगस्टला पूर्वेकडील काही जिल्ह्यात तर ठिकाणी वादळी वाऱ्यासह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असल्याने या ठिकाणी सुद्धा यल्लो अलर्ट देण्यात आला आहे.

पुणे आणि परिसरासाठी पुढील पाच दिवस आकाश सामान्यतः ढगाळ राहून हलक्या ते मध्यम पावसाच्या काही सरी पडण्याची शक्यता आहे. तर आज घाट विभागात ठिकाणी खूप जोरदार पाऊस व त्यानंतर पुढील तीन दिवस घाटात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने घाट क्षेत्रासाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर