Maharashtra Weather Update : राज्यात पावसाचा जोर वाढला! पुणे, मुंबई, सातारा कोकणात पुढील काही तासात जोरदार बरसणार
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Weather Update : राज्यात पावसाचा जोर वाढला! पुणे, मुंबई, सातारा कोकणात पुढील काही तासात जोरदार बरसणार

Maharashtra Weather Update : राज्यात पावसाचा जोर वाढला! पुणे, मुंबई, सातारा कोकणात पुढील काही तासात जोरदार बरसणार

Jul 25, 2024 07:32 AM IST

Maharashtra Weather Update : राज्यात पुढील काही तासांत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी व सतर्क राहावे असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

राज्यात पावसाचा जोर वाढला! पुणे, मुंबई, सातारा कोकणात पुढील काही तासात जोरदार बरसणार
राज्यात पावसाचा जोर वाढला! पुणे, मुंबई, सातारा कोकणात पुढील काही तासात जोरदार बरसणार (Vijay Gohil)

Maharashtra Weather Update : राज्याला पावसाने चांगलेच झोडपले आहे. बुधवारी रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे पुण्यात पुरस्थिती निर्माण झाली आहे. पुण्यातील भिडे पूल पाण्याखाली गेला आहे. राज्यात पुढील काही तासांत पावसाचा जोर वाढणार असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. हवामान विभागाने आज, मुंबई, रत्नागिरी, रायगड, पुणे, सातारा, ठाणे, पालघर, सातारा, कोल्हापूर परिसरात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली असून या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुणे विभागाच्या घाट विभागात अतिवृष्टी होण्याची शक्यता असून या ठिकाणी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार समुद्र सपाटीवरील कमी दाबाचा पट्टा आज दक्षिण गुजरात ते उत्तर केरळ किनारपट्टी लगत सक्रिय आहे. पुढील ४८ तासात गोव्यासह संपूर्ण राज्यात बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज २५ रोजी पालघर व रायगड जिल्ह्यात २४ तासांमध्ये काही ठिकाणी खूप जोरदार तर तुरळक ठिकाणी अत्यंत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे व सातारा जिल्ह्याच्या घाट विभागात २४ तासात तुरळ ठिकाणी अत्यंत जोरदार म्हणजे २०५ मीमी पेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता असल्याने वरील सर्व ठिकाणी रेड अलर्ट देण्यात आलेला आहे.

पुढील २४ तासात ठाणे, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, कोल्हापूरच्या घाट विभागात तर पालघर ठाणे रायगड रत्नागिरी कोल्हापूर व साताऱ्याच्या घाट विभाग जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उद्या २६ जुलै रोजी रायगड रत्नागिरी पुणे व सातारा जिल्ह्याच्या घाट विभागात तुरळ ठिकाणी २४ तासात खूप जोरदार म्हणजेच ११६ मिलिमीटर ते २०४ मिलिमीटर पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. आज मुंबईला, उद्या २६ तारखेला सिंधुदुर्ग व 27 ला रत्नागिरी व पुणे व सातारा जिल्ह्याचा घाट विभागात २४ तासात खूप जोरदार तर तुरळक ठिकाणी खूप जोरदार म्हणजे २४ तासांत ११६ मिलिमीटर ते २०४ मिलीमीटर पाऊस पडण्याची शक्यता असल्याने वरील जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे.

आज जळगाव, अहमदनगर, छत्रपती, संभाजी नगर, बीड, धारशिव जिल्ह्यात देखील जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर नाशिक जिल्ह्याचा घाट विभाग, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड येथे देखील जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. २६ जुलै रोजी पालघर, ठाणे, मुंबई, कोल्हापूर जिल्ह्याचा घाट विभाग तर २७ जुलै रोजी ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, २८ तारखेला रायगड, रत्नागिरी, सातारा, पुणे येथे जोरदार म्हणजेच ११६ मीमी ते २१७ मीमी पाऊस पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे वरील सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पुण्यात आकाश ढगाळ राहून दिवसभर जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर घाट विभागात अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याने तिथे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर