मुंबई : मेडिकल सायन्समध्ये अतिशय गुंतागुंतीची समजली जाणारी लहान आतडे प्रत्यारोपाणाचची शस्त्रक्रिया यशस्वी करण्याची किमया मुंबईतील डॉक्टरांच्या पथकाने केली आहे. आता पर्यंत केवळ भारतात या प्रकारच्या १२ शस्त्रक्रीया पार पडल्या आहेत. यामुळे भविष्यात या प्रकारच्या आजार असणा-या रुग्णांना दिसाला मिळणार आहे. मुंबईतील डॉ. गौरव चौबळ यांनी ही किमया करून दाखवली आहे.
ग्लोबल रुग्णालयातील बहू अवयव प्रत्यारोपण केंद्राने अनिर्बन सामंता या ४६ वर्षीय रुग्णावर मुंबईतील पहिली लहान आतडे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे पाडली. लहान आतड्याचे प्रत्यारोपण, एक जटिल आणि दुर्मिळ शस्त्रक्रिया आहे. भारतात केवळ १२ वेळा ही शस्त्रक्रीया आतापर्यंत झाली आहे. यापैकी ५०टक्क्याहून अधिक पेक्षा जास्त शस्त्रक्रिया महाराष्ट्रात झाल्या असून मुंबईत होणारी ही पहिलीच शस्त्रक्रिया आहे.
अनिर्बन सामंत यांना एप्रिल २०२२ मध्ये ओटीपोटात तीव्र वेदना होत होत्या. त्यांना सुपीरियर मेसेंटरिक आर्टरी थ्रोम्बोसिस या आजाराचे निदाल झाले होते. या आजारात आतड्यांना गँगरीन होतो. त्यांनी स्थानिक रुग्णालयात उपचार घेऊन १७ एप्रिल २०२२ ला त्यांच्यावर रिसेक्शन अॅनास्टोमोसिस आणि जेजुनोस्टॉमी करण्यात आली. यानंतर डॉक्टरांनी त्यांना पॅरेंटरल न्यूट्रिशनवर ठेवलेले. मात्र, त्यांची प्रकृती बिघड असल्याने डॉकटरांनी लहान आतड्याच्या प्रत्यारोपणाचा निर्णय घेतला.
या बाबत डॉ. गौरव चौबळ म्हणाले, आतडी मुरगळणे, जन्मजात दोष आहे. गेल्या महिन्याच्या सुरुवातीला, अनिर्बनला झोनल ट्रान्सप्लांट कोआॅर्डिनेशन सेंटर येथे अवयव प्रत्यारोपणासाठी आणण्यात आले. अमच्या पुढे अनेक आव्हाने होती. रुग्णाने शस्त्रक्रियेनंतर उत्तम प्रतिसाद दिला. आता त्या पूर्ण ब-या आहेत. चौबळ म्हणाले, अवयव दान ही आजच्या काळाची गरज आहे. नागरिकांनी या संदर्भात पुढे येण्याचे आवाहनही चौबळ यांनी केले. आतडी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया ही गुंतागुंतीची असते. या शस्त्रक्रीयेमुळे आम्हला केवळ भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही येत्या काळात मदत होणार आहे.
अनिर्बन सामंता म्हणाले, मी कोलकात्यात असताना तिथल्या डॉक्टरांनी मी दोन महिन्यांहून अधिक काळ जगेन असे सांगितलेले. यामुळे मी जगण्याची आशा सोडून दिली होती. मात्र, डॉ. गौरव चौबळ यांच्याबद्दल माहिती मिळाली . आम्ही त्यांना भेटण्यासाठी मुंबईला आलो. आणि त्यांनी मला बरे होण्याची आशा दिली. त्यांनी माझी शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली. यामुळे मी त्यांचा ऋ णी आहे. या सोबतच आमच्या गरजेच्या वेळी अवयव दान करण्याचा उदार निर्णय घेतल्याबद्दल आम्ही दात्या कुटुंबाचे आभार मानू इच्छितो.
ग्लोबल हॉस्पीटलचे सीईओ डॉ. विवेक तलौलीकर म्हणाले, आव्हानात्मक आणि गुंतागुंतीची ही शस्त्रक्रिया पार पाडणा-या टीमचे कौतूक आहे. आतडे प्रत्यारोपणाचे यश हा रुग्णालयासाठी अभिमानास्पद क्षण आहे.