Pune murder : शेतावर कामाला आला नाही म्हणून मजुराचा खून! आधी कोयत्याने वार केले, मग कारने चिरडले
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune murder : शेतावर कामाला आला नाही म्हणून मजुराचा खून! आधी कोयत्याने वार केले, मग कारने चिरडले

Pune murder : शेतावर कामाला आला नाही म्हणून मजुराचा खून! आधी कोयत्याने वार केले, मग कारने चिरडले

Jul 09, 2024 08:56 AM IST

Pune mandvi budruk murder : पुण्यात शेतात कामावर आला नाही या किरकोळ कारणावरून मजुराची हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. मजुराला दवाखान्यात घेऊन जात असताना आरोपीने जखमी पती पत्नीला कारने चिरडण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला. यात मजुराचा मृत्यू झाला तर पत्नी जखमी झाली आहे.

धक्कादायक! शेतावर कामाला आला नाही म्हणून मजुराचा खून! आधी कोयत्याने केले वार मग कारने चिरडले
धक्कादायक! शेतावर कामाला आला नाही म्हणून मजुराचा खून! आधी कोयत्याने केले वार मग कारने चिरडले

Pune mandvi budruk murder : पुण्यातील खडकवासला धरणाच्या मागे असलेल्या मांडवी बुद्रुक या गावी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शेतावर कामाला आला नाही या किरकोळ कारणावरून एका मजुराला कोयत्याने मारहाण करण्यात आली. ऐवढेच नाही तर त्याला दवाखान्यात नेत असतांना आरोपींनी त्याच्या अंगावर गाडी घालून चिरडण्याचा देखील प्रयत्न केला. या मजुराचा पुण्यातील ससुन रुग्णालयात उपचार सुरू असतांना मृत्यू झाला. तर त्याची पत्नी देखील जखमी झाल्याने तिच्यावर देखील ससुन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भरत लक्ष्मण वाल्हेकर (वय ५५, सध्या रा. मांडवी बुद्रुक, ता. हवेली, मूळ रा. रोहा, जि. रायगड) असे खून झालेल्या मजुराचे नाव आहे. तर पत्नी अनुसया वाल्हेकर या जखमी आहेत. संजय हिंदुराव पायगुडे (वय ५०, रा. मांडवी बुद्रुक) आणि सचिन नथु पायगुडे (वय ४५, रा. मांडवी बुद्रुक) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपी संजय पायगुडेला अटक करण्यात आली आहे. सचिन पायगुडे हा फरार झाला आहे. ही घटना बुधवारी (३ जुलै) रात्री ९.३० च्या सुमारास मांडवी बुद्रुक गावात घडली. या प्रकरणी गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला. ससून रुग्णालयाने याची माहिती पोलिसांना दिल्यावर हे प्रकरण उघडकीस आले. या प्रकरणी तपास सुरू करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी भरतची पत्नी अनुसया वाल्हेकर हिने दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरत आणि अनुसया हे दोघे पती पत्नी मांडवी बुद्रुक येथील शेतकरी विलास दिनकर पायगुडे यांच्याकडे काम करत होते. या गावात एक छोटी खोली भाड्याने घेऊन ते राहत होते. आरोपी सचिन हा विलास यांचा पुतण्या आहे. भरत हा मूळचा रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील आहे.

विलास पायगुडे यांच्याकडे काम नसेल तेव्हा वाल्हेकर पती पत्नी हे गावातील इतर शेतकऱ्यांकडे काम करत असे. दरम्यान, घटनेच्या तीन-चार दिवस आधी वाल्हेकर हे पायगुडे यांच्याकडे कामाला गेलेले नव्हते. भरत हा बुधवारी गावातील दुसऱ्या शेतकऱ्याकडे काम करताना सचिन पायगुडे याला दिसला. त्यामुळे सचिन संतप्त झाला. त्याचा राग अनावर झाल्याने त्याने भरत वाल्हेकरशी शेतातच वाद घातला. यानंतर त्याने त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याच्याजवळील कोयत्याने भरतला गंभीर मारहाण केली. यावेळी भरतची पत्नी अनुसया देखील मध्ये पडली. तेव्हा सचिनने तिच्यावर देखील कोयत्याने वार केले.

दोघेही गंभीर जखमी झाल्याने बुधवारी रात्री ते ९.३० च्या सुमारास रुग्णालयात पायी जात असतांना आरोपी सचिनने दोघांच्या अंगावर कार घातली. यावेळी कारमध्ये संजय पायगुडे देखील होता. कारने चिरडल्याने दोघेही पती पत्नी गंभीर जखमी झाले. या नंतर गे फरार झाले. गावातील नागरिकांनी वाल्हेकार दाम्पत्याला ससुनमध्ये दाखल केले. मात्र, रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच भरत वाल्हेकरचा मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती ससून रुग्णालयाने पोलिसांना दिली. शवविच्छेदन अहवालात कोयत्याने खून झाल्याचे नमूद करण्यात आले. या प्रकरणाचा तपास करतांना या प्रकारचा उलगडा झाला. सध्या पोलिस घटनास्थळी असणारे सीसीटीव्ही तपासत आहे. तर भरतची पत्नी अनुसया हिने देखील जबाब दिला असून त्यानुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर