प्रियकरानं लग्न करण्यास नकार दिल्यानं प्रेयसीने घेतला गळफास; हिंजवडीत ५ जणांवर गुन्हा-the girl took an extreme step as her boyfriend refused to marry her in hinjewadi pune pimpri chinchwad ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  प्रियकरानं लग्न करण्यास नकार दिल्यानं प्रेयसीने घेतला गळफास; हिंजवडीत ५ जणांवर गुन्हा

प्रियकरानं लग्न करण्यास नकार दिल्यानं प्रेयसीने घेतला गळफास; हिंजवडीत ५ जणांवर गुन्हा

Sep 03, 2024 01:22 PM IST

hinjewadi crime : हिंजवडीत एका तरुणीनं टोकाचं पाऊल उचललं आहे. प्रियकराने लग्नास नकार दिल्यानं तरुणीनं आत्महत्या केली आहे.

प्रियकरानं लग्न करण्यास नकार दिल्यानं प्रेयसीने उचललं टोकाचं पाऊल; गळफास घेत संपवलं जीवन; हिंजवडीत ५ जणांवर गुन्हा
प्रियकरानं लग्न करण्यास नकार दिल्यानं प्रेयसीने उचललं टोकाचं पाऊल; गळफास घेत संपवलं जीवन; हिंजवडीत ५ जणांवर गुन्हा

hinjewadi crime : प्रेमात अपयश आल्यावर टोकाची भूमिका घेणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. पुण्यात आयटी नगरीत नुकतीच एक अशी घटना उघकडीस आली आहे. एका तरुणीला प्रियकराने लग्न करण्यास नकार दिल्यानं तीनं टोकाचं पाऊल उचललं आहे. तिने तिच्या राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवलं आहे. ही घटना शनिवारी दुपारी ४ घडली असून या प्रकरणी सोमवारी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी १९ वर्षीय तरुणीच्या वडिलांनी रविवारी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सुबोध सुधीर साखरे (२५, रा. साखरे वस्ती, हिंजवडी), रोहन सुदाम पारखी (३०, रा. मुलानी वस्ती, माण, ता. मुळशी) यांच्यावर गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली आहे. तसेच सुधीर साखरे, सुबोध साखरे याची आई व आणखी एका महिलेवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सुबोध साखरे व आत्महत्या केलेल्या मुलीचे फिर्यादीच्या १९ वर्षीय मुली सोबत गेल्या काही वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मुलीने सुबोधकडे लग्न करण्याचा तगदा लावला होता. मात्र, सुबोध व त्याच्या नातेवाईकांनी मुलीला लग्नास नकार दिला. त्यांनी काहीही झाले तरी लग्न लावून देणार नाही, असे म्हटले. सुबोधच्या या भूमिकेमुळे मुलगी ही नैराश्यात होती. ती घरी कुणासोबत बोलत नव्हती. रविवारी याच नैराश्यातून तिने टोकाचा निर्णय घेतला. शनिवारी ४ च्या सुमारास तिने घरात एका खोलीत ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

पिंपरीत कोयता गँगची दहशत

पिंपरीत कोयता गँगने दहशत माजवली आहे. एकाने उसने दिलेले पैसे परत मागितल्याच्या कारणावरून त्याच्यावर कोयत्याने वार केले. या घटनेत नागेश बाबू राठोड (वय ३७, रा. इंदिरानगर, चिंचवड स्टेशन) हा तरुण जखमी झाला आहे. ही घटना येथील संभाजीनगरमध्ये घडली असून त्याने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी तेजस उर्फ बबलू दिगंबर शिंदे (वय २९) व दीपक राम मोरेया दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नागेश हा साई उद्यानाजवळ होता. त्यावेळी तेजस व दीपक या दोघांना नागेशने उसने दिलेले पैसे परत मागितले. या रागातून दीपक याच्या बहिणीला झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतून घर मिळण्यास आडकाठी का करतो ? असे म्हणत तेजसने कोयत्याने नागेशवर वार केले. यात तो गंभीर जखमी झाला. यानंतर आरोपी हवेत कोयते फिरवून दहशत माजवून फरार झाले.