Nagpur government medical collage student suicide : नागपुरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस करणाऱ्या एका तरुणाने परीक्षेच्या तणावातून टोकाचे पाऊल उचलत रेल्वे खली येऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी संध्याकाळी ६.३० वाजता घडली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
पवन काकडे (वय २३, रा. वाशिम) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पवन काकडे हा शासकीय मेडिकल कॉलेजचा एमबीबीएसच्या अंतिम वर्षात शिकत होता. सध्या कॉलेजच्या परीक्षा सुरू आहेत. महाविद्यालयाकडून एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षाचा परीक्षेची तयारी करवून घेतली जात होती.
त्याचा उद्या सोमवारी बालरोग विभागाचा पेपर होता. मात्र, पवन हा गेल्या काही दिवसांपासूने अभ्यासाच्या तणावात होता. तो एकटाच राहत होता. दरम्यान, पवन हा शनिवारी कुणालाही काही संगता हा कॉलेजच्या वसतिगृहातून बाहेर पडला. तो येथील बुटीबोरी रेल्वेस्थानकावर संध्याकाळी ६.३०च्या सुमारास गेला. यावेळी, त्याने एका रेल्वे खाली उडी मारून आत्महत्या केली.
दरम्यान, या घटनेची माहिती कॉलेज प्रशासनाला समजताच त्यांना व त्याच्या मित्रांना धक्का बसला आहे. शनिवारी पवनच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी कॉलेजच्या बाहेर मोठी गर्दी झाली होती.