Pune New Year Celebration : पुण्यात ३१ तारखेला हॉटेल, पब, बार आदी ठिकाणी पार्ट्या आयोजित करण्यात आल्या आहेत. या ठिकाणी मद्यासोबत खाद्य पदार्थ देखील विकले जातात. हे खाद्य पदार्थ चांगले आणि दर्जेदार द्यावी लागणार आहे. निकृष्ट खाद्य पदार्थ देणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. या साठी नवीन वर्षाच्या जल्लोषात नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अन्न व औषध प्रशासनान शहरातील सर्व हॉटेल, पब, आणि बारमधील खाद्य पदार्थ तपासण्याचा निर्णय घेतला आहे.
३१ डिसेंबरच्या पार्ट्या निमित्त शहरातील हॉटेल, रेस्टॉरंट आणि क्लबमध्ये येणाऱ्या नागरिकांना विविध प्रकारचे अन्न पदार्थ सर्व्ह केले जातात. या काळात निकृष्ट अन्नपदार्थाचा पुरवठा केला जाण्याची शक्यता असते. परिणामी नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शसकतात. यामुळे अन्न व औषध प्रशासन पुण्यातील हॉटेलमधील खाद्य पदार्थांची तपासणी करणार आहे.
सर्वाधिक पार्ट्या या ३१ डिसेंबरला होतात. मात्र, हॉटेलचालक अन्नपदार्थ तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल एक ते दोनआठवड्यांपूर्वी खरेदी करतात. त्यामुळे तो खराब होण्याची शक्यता असून नागरिकांना निकृष्ट व खराब अन्न पदार्थ दिले जाण्याची शक्यता असू शकते. त्यामुळे अधिकाऱ्यांनी २४ डिसेंबरपासून तपासणी मोहीम हाती घेतली आहे. या कालावधीत जास्तीत जास्त हॉटेल आणि रेस्टॉरंटची तपासणी करण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत.
पुण्यातील हॉटेल आणि पब, बारला ३१ तारखेला व १ तारखेला पहाटे ५ पर्यंत हॉटेल सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे रात्रभर पार्ट्या रंगणार आहेत. पुणेकर यामुले नवींन वर्षांचे जल्लोषात स्वागत करून सरत्या वर्षाला निरोप देणार आहेत.
३१ तारखेला अनुचित प्रकार घडू नये यासाठी पुण्यात चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. पुण्यात ३१ च्या रात्री पोलिस गस्त वाढवणार आहे. तसेच दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांवर देखील कारवाई केली जाणार आहे.
संबंधित बातम्या