Maharashtra Tiger and leopard death : राज्यात वन्य प्राणी आणि मानवी संघर्ष वाढला आहे. या संघर्षात राज्यात ११ वाघ आणि १८ बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. काही जणांची शिकार करण्यात आली तर काही वन्य प्राणी हे रस्ते अपघात, विजेचा धक्का तर काहींचा भक्ष्य सोधतांना विहिरीत पडल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. वन्य प्राण्यांच्या मृत्यूचा हा वाढता आकडा चिंताजनक आहे. काही घटनांचा शवविच्छेदन अहवाल मिळालेला नाही. त्यामुळे त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
राज्यातील १४ जिल्ह्यामध्येही या घटना घडल्या आहेत. रेल्वेची धडक झाल्यामुळे राज्यात १ वाघाचा तर २ बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. तर ३ वाघांचा मृत्यू हा वाहनांच्या धडकेमुळे झाला आहे तर ४ बिबट्यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. तर पाच बिबटे हे विहिरीत व कालव्यात पडून मृत्यू झाला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात २ जानेवारी रोजी सिंदेवाही वनपरिक्षेत्रात एका वाघाचा वृद्धापकाळाने वाघाचा मृत्यू झाला होता. तर ६ जानेवारी रोजी भंडारा जिल्ह्यात तुमसर वनपरिक्षेत्रात वाघिणीची शिकार करण्यात आली होती. तिला विजेच्या धक्का देण्यात आला होता. ७ जानेवारी रोजी यवतमाळ जिल्ह्यातील उकणी (ता. वणी) येथे एक वाघ मृतावस्थेत आढळला होता. त्याचा मृत्यू नेमका कसा झाला याची माहिती मिळू शकली नाही. ११ जानेवारीला चंद्रपूरच्या मूल बफर वनपरिक्षेत्रात वाहनाच्या धडकेमुळे वाघाचा मृत्यू झाला होता. तर १९ जानेवारी सिंदेवाही येथे देखील एक वाघ मृतावस्थेत आढळला होता. १९ जानेवारी रोजी गोंदिया जिल्ह्यातील भानपूर येथील एका घटनेत आजारपणामुळे वाघाचा मृत्यू झाला होता.तर वर्धा जिल्ह्यात २२ जानेवारी रोजी धोंडगाव वनपरीक्षेत्र वाहनाच्या धडकेत बछड्याचा मृत्यू झाला होता. तर नागपूर येथे ८ ते १५ जानेवारी या कालावधीत देवलापार वनपरिक्षेत्रात उपासमारीमुळे दोन वाघांचा मृत्यू झाला होता. तर २२ जानेवारी रोजी पेंच व्याघ्र प्रकल्पात एका वाघाचा रंटूयू झाला होता. त्याच्या मृत्यूचे कारण समजू शकले नाही. तर याच दिवशी समुद्रपूर वनपरिक्षेत्रातील गिरड सहवनक्षेत्रात रस्ते अपघातात एका वाघाचा मृत्यू झाला होता. ही आकडेवारी चिंताजनक आहे.
संबंधित बातम्या