and slide in Pune Adarwadi : पुणे जिल्ह्यात आज पावसाने धुमाकूळ घातला आहे. पुणे जिल्ह्यातील खेड, मावळ, जुन्नर, आंबेगाव, भोर, वेल्हा, मुळशी तालुक्यात जोरदार पाऊस सुरू आहे. पुढील काही तासांत आणखी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मावळ तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आदरवाडी येथे डोंगराचा कडा कोसळून ढिगारा रस्त्यावर आला आहे. तर काही दगडी येथील हॉटेल पिकनिक येथे कोसळल्याने एकाचा मृत्यू तर १ जण जखमी झाला आहे.
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. लोणावळ्यात काल पासून ५६५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर पुढील काही तासांत पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. मावळ तालुक्यातील आदरवाडी गाव परिसरात काल रात्री पासून जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे येथील एका डोंगराचा कडा तुटून थेट रस्त्यापर्यंत आला आहे. रस्ता ते डोंगर यामधील अंतर अंदाजे ५०० मी आहे. १० ते १२ फूट उंचीचा मातीचा स्तर रस्त्यावर पसरला आहे. हा रस्ता मोकळा करण्यासाठी किमान ५-६ तास तरी लागणार आहे. यातील एक कडा हा पिकनिक हॉटेलमधील १ व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर १ जखमी आहे.
जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे हे जिल्ह्यातील परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. त्यांनी उप विभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्याशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला आहे. जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तसेच मदत व बचाव पथकांना सज्ज राहण्याचे आदेश देखील त्यांनी दिले आहेत. पुणे महानगरपालिका प्रशासनाने नदीकाठच्या भागात आवश्यक दक्षतेचे उपाय करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. पुढील ४८ तासात धोकादायक पर्यटन स्थळांवर पर्यटकांना बंदी करावी, धोकादायक ओढे, नाले, पुलावरील वाहतूक बंद ठेवावी असे निर्देशही डॉ.दिवसे यांनी दिले आहेत.
पुण्यात सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील शाळा आज बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्यातील घाट विभागात देखील पावसाचा जोर वाढला आहे. या पावसामुळे पुण्यातील धरणात पाण्याची आवक वाढली आहे. जिल्ह्यात अनेक नद्यांना ओढ्या नाल्यांना पुर आल्याने व धरणातील पाणी वाढणल्याने खबरदारीचा उपाय म्हणून शाळांना सुट्टी जाहिर करण्यात आली आहे.
संबंधित बातम्या