मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  हा कसा कृषीमंत्री? दादा भुसे गुवाहाटीत, पेरणीच्या हंगामात शेतकरी वाऱ्यावर…

हा कसा कृषीमंत्री? दादा भुसे गुवाहाटीत, पेरणीच्या हंगामात शेतकरी वाऱ्यावर…

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jun 24, 2022 01:28 PM IST

एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीमुळे शिवसेनेला भगदाड पडले आहे. शिवसेनेचे अनेक आमदार हे शिवसेनेला जय महाराष्ट्र करत एकनाथ शिंदे यांच्या गटाला जाऊन मिळाले आहे. कृषी मंत्री दादा भुसे हे सुद्धा गुवाहाटीला जात शिंदे गटात सामील झाले आहे. यावर खासदार संजय राऊत यांनी सुचक व्टिट केले आहे.

Sanjay Raut criticized agriculture minister Dada Bhuse
Sanjay Raut criticized agriculture minister Dada Bhuse

Maharashtra political crisis  एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीमुळे राज्यात सत्तेचा पेच निर्माण झाला आहे. शिवसेनेचा एक एक आमदार शिंदे गटात सामिल होत आहे. यामुळे शिवसेनेला मोठे भगदाड पडले आहे. राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे हे सुद्धा गुवाहाटीला जात एकनाथ शिंदे यांच्या गटात जाऊन सामिल झाले आहे. सध्या राज्यात खरीप हंमाग सुरू आहे. त्यात कृषी मंत्री राज्यात नसतांना शेतकरी वा-यावर पडला आहे. यावर खासदार संजय राऊत यांनी व्टिट करत या प्रकरणी लक्ष घालण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आवाहन केले आहे.

 

राज्यात सध्या खरीप पेरण्यांचा हंगाम सुरू आहे. त्यात पाऊस लांबला आहे. यामुळे या पेरण्यांवर संकट आले आहे. कृषी विभागाने या संदर्भात शेतक-यांना मार्गदर्शन करणे अपेक्षित असतांना स्वत: कृषी मंत्री हे राज्यातील शेतक-यांना वा-यावर सोडून राज्याबाहेर गेले आहे.

राज्यात शिंदे यांच्या बंडाळीमुळे पेचप्रसंगी निर्माण झाले आहे. अनेक मंत्री या बंडाळीत सामिल असल्याने त्यांच्या खात्याचे कामे रखडली आहे. याचा विकास कामांवर परिणाम होत आहे. सध्याचा कृषी हंगाम पाहता पाऊस लांबला आहे. त्यामुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे. अशा स्थितीत शेतक-यांना मदत करणे महत्वाचे आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी या सत्तापेच सुरू असतांना शेतक-यांच्या दृष्टीने व्टिट केले आहे.

राऊत यांनी केलेल्या व्टिट नुसार, खरीप हंगामात कृषी मंत्री प्रत्येक आठवड्यात राज्यातील पेरणीचा आढावा घेत असतात. सध्या राज्यात पाऊस कमी आहे. पेरण्या लांबणीवर पडल्या आहेत. अशा स्थितीत राज्याचे कृषी मंत्री हे आसाममध्ये चिंतन शिबिरात जाऊन बसल्याने शेतकरी वा-यावर आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आपण कृपया यात लक्ष द्यावे, असे आवाहन राऊत यांनी केले आहे.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग