Pune Youth viral video : पुणे तेथे काय उणे ही म्हण जगात प्रसिद्ध आहे. त्यात पुणेरी पाट्या हा देखील वेगळाच विषय आहे. पुण्यातील पाट्या या प्रसिद्ध आहे. याच पुणेरी पाट्यांचा आधार घेत एका पुणेरी तरुणानं चक्क एका चोराला भावनिक साद घातली आहे. या तरुणाची बाइक एका चोराने चोरून नेली आहे. ती बाइक त्याला त्याच्या आईने घेऊन दिली. ती त्याच्या आईची शेवटची आठवण असल्याने त्याने एका पोस्टरवर लिहीत बाइक परत करण्यासाठी चोराला साद घालत विनंती केली आहे. त्याचा हाती पोस्टर घेतलेला फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.
व्हायरल होत असलेल्या या तरुणाचे नाव अभय चौगुले असे आहे. अमोलने दसऱ्याच्या दिवशी त्याची दुचाकी ही संध्याकाळी ७ च्या सुमारास कोथरूड कर्वे पुतळ्या परिसरात बंद पडल्याने कोथरूड गावठाणलगत असलेल्या कमानी जवळील रस्त्याजवळ मित्राच्या घराजवळ लावली होती. यानंतर हा अमोल रिक्षाने घरी गेला. रविवारी दिवसभर कामांमुळे त्याला त्याची दुचाकी आणायला वेळ मिळाला नाही. जेव्हा अमोल हा गाडी घेण्यासाठी परत मित्राच्या घराजवळ गेला, तेव्हा त्याला त्याची बाइक दिसली नाही. त्याने व त्याच्या मित्राने संपूर्ण परिसर पिंजून काढला. मात्र, त्याची बाइक काही सापडली नाही. शेवटी त्याने पोलिस ठाणे गाठत कोथरूड पोलिस ठाण्यात त्याची दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार दिली.
मात्र, ही गाडी त्याच्या आईने तो १२ वीत असताना घेऊन दिली होती. त्याची आई आता हयात नाही. ही बाइक त्याच्या आईची शेवटची आठवण अवसल्याने त्याला ही दुचाकी पुन्हा हवी आहे. त्यामुळे त्याने थेट पोस्टर लिहीत चोराला साद घातली असून पुण्यातील रस्त्यावर हे पोस्टर घेऊन हा तरुण फिरतोय. या पोस्टर द्वारे त्याची दुचाकी चोराने परत करावी अशी भावनिक साद त्याने चोराला घातली आहे. या पोस्टरसोबतचा त्याचा व्हिडिओ हा सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे हा तरुण सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. त्याने या माध्यमातून चोराला त्याची दुचाकी परत करण्याची विनंती त्याने केली आहे.
पिवळ्या पोस्टरवर तरूणाने चोराला भावनिक साद घातली आहे, त्यात त्याने लिहिलं आहे की, “माझी काळी एक्टिवा MH14B6036 दसऱ्याच्या दिवशी चोरीला गेली. ही माझ्या आईची शेवटची आठवण आहे. कृपया मला ही गाडी शोधण्यात मदत करा. ज्याने कुणी ही गाडी चोरली असेल त्याने ती मला परत करावी. ९७६६६१७४६४.” दुसऱ्या एका पोस्टरवर त्याने लिहिले की, “माझी ॲक्टिव्हा चोरणाऱ्या चोराला नम्र विनंती, माझ्या आईने खूप मेहनत करून मी १२ वीत असतांना ही बाइक विकत घेऊन दिली आहे. ही तिची शेवटची आठवण आहे, कृपया ती परत करा. मी तुला नवीन वाहन घेईन, पण कृपया माझ्या आईची स्कूटर परत द्या.”
संबंधित बातम्या