मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Thane Water Cut : ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; आज 'या' भागांतील पाणीपुरवठा २४ तास बंद

Thane Water Cut : ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; आज 'या' भागांतील पाणीपुरवठा २४ तास बंद

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Jan 19, 2024 08:59 AM IST

Thane Water Supply: ठाण्यात आजपासून २४ तास पाणी पुरवठा बंद असणार आहे. यामुळे नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे महानगरपालिकेकडून आवाहन करण्यात आलेहे.

Thane Water Supply
Thane Water Supply

Thane Municipal Corporation: ठाणेकरांना पुन्हा एकदा पाणी कपातीचा सामना करावा लागणार आहे. ठाणे महानगरपालिकेने देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांमुळे आज शुक्रवारपासून (१९ जानेवारी) २४ तास पाणी बंद ठेवण्याची घोषणा केली.यामुळे शहरातील काही भागांचा पाणीपुरवठा शुक्रवारी चोवीस तासांसाठी बंद राहणार आहे. या बंदमुळे पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याने नागरिकांना पाणी टंचाई समस्येला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे

दुरुस्तीच्या कामांमुळे पाणी कपात

ठाणे महानगरपालिकेने टेमघर जलशुद्धीकरण केंद्रात मोटार नियंत्रण पॅनेल बसवणे आणि कळवा प्रभाग समिती अंतर्गत मुख्य जलवाहिनीला जोडणे यासारख्या काही तातडीच्या कामांचा उल्लेख केला आहे. ठाण्यात १९ जानेवारी सकाळी ९ वाजल्यापासून ते २० जानेवारी सकाळी ९ वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याने नागरिकांना पाणी टंचाई समस्येला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

Thane: ठाण्यातील घोडबंदर रोडवर भीषण अपघात, कंटेनरला आग लागल्याने एकाचा मृत्यू

या भागांत पाणी पुरवठा होणार नाही

दरम्यान, घोडबंदर रोड, लोकमान्यनगर, वर्तकनगर, साकेत, ऋतुपार्क, जेल, गांधीनगर, रुस्तमजी, सिध्दांचल, इंदिरानगर, रुपादेवी, श्रीनगर, समतानगर, सिद्धेश्वर, इटर्निटी, जॉन्सन, मुंब्रा आणि कळव्याच्या काही भागातील पाणीपुरवठा २४ तासांसाठी बंद राहील, असे पालिकेकडून सांगण्यात आले आहे.

ठाणे महानगरपालिका क्षेत्रात चार स्त्रोतांमार्फत दररोज ५८५ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा केला जातो. त्यात महापालिकेच्या स्वत:च्या योजनेतून २५० दशलक्षलीटर, स्टेम प्राधिकरणाकडून ११५ दशलक्षलीटर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून १३५ दशलक्षलीटर आणि मुंबई महापालिकेकडून ८५ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो.

WhatsApp channel

विभाग