मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Thane Accident: ठाण्यात दुचाकीवरून जाताना अपघात, उड्डाणपुलावरून खाली पडल्याने दोघांचा मृत्यू
Thane Road Accident
Thane Road Accident (HT)

Thane Accident: ठाण्यात दुचाकीवरून जाताना अपघात, उड्डाणपुलावरून खाली पडल्याने दोघांचा मृत्यू

24 January 2023, 14:00 ISTAshwjeet Rajendra Jagtap

Thane Road Accident: ठाण्यात उड्डाणपुलावरून जात दुचाकीला अपघात घडला. या अपघात दोघांचा मृत्यू झाला असून पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.

Thane Accident: महाराष्ट्राच्या ठाणे जिल्ह्यात दुचाकीवरून जात असताना उड्डाणपुलावरून खाली पडल्याने दोघांचा मृत्यू झाला. आज (२४ जानेवारी २०२३) पहाटे हा अपघात घडला. दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचे सांगितले जात आहे. दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले असून पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करीत आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

जेश बेचनप्रसाद गुप्ता (वय- २६, रा.उल्हासनगर) आणि प्रतिक विनोद मोरे (वय-२१, रा. ठाणे, लोकमान्य नगर) असे या अपघातात मृत्यू झालेल्या तरूणांची नावे आहेत. दरम्यान, दोघेही आज पहाटे ३.३० च्या सुमारास दुचाकीने माजिवडा येथून ठाणे स्थानकाकडे जात होते. परंतु, कॅसल मिल नाका येथील उड्डाणपुलावरून जात असताना त्याच्या दुचाकीला अपघात झाला, अशी माहिती ठाणे महापालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख अविनाश सावंत यांनी दिली.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांना तातडीने ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचे पोलिसांनी माहिती दिली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक तपास करीत आहेत.

विभाग