Anand Ashram : ठाण्यातील आनंद आश्रमात उधळल्या नोटा; VIDEO आला समोर, केदार दिघेंचा संताप
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Anand Ashram : ठाण्यातील आनंद आश्रमात उधळल्या नोटा; VIDEO आला समोर, केदार दिघेंचा संताप

Anand Ashram : ठाण्यातील आनंद आश्रमात उधळल्या नोटा; VIDEO आला समोर, केदार दिघेंचा संताप

Sep 13, 2024 11:53 PM IST

Anand ashramvideo : ठाण्यातील आनंद आश्रमात नोटा उधळल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी हा व्हिडिओएक्सवर पोस्ट करताना संताप व्यक्त केला आहे.

 ठाण्यातील आनंद आश्रमात उधळल्या नोटा
 ठाण्यातील आनंद आश्रमात उधळल्या नोटा

ठाण्यातील टेंभी नाका येथील शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या आनंद आश्रमात लोकांनी नोटा उधळल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी या घटनेचा व्हिडीओ ट्विट करत या प्रकारावर टीका केली आहे. केदार दिघे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे ठाणे जिल्हाप्रमुख आहेत. तुम्ही आनंद आश्रमात नोटा उधळल्या. दिघे साहेबांच्या समाजसेवेचे पावित्र्य नष्ट केले. आमचा आनंद हरपला,असं ट्विट केदार दिघे यांनी करत नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे.

आश्रमात नोटा उधळल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी हा व्हिडिओएक्सवर पोस्ट करताना संताप व्यक्त केला आहे. केदार दिघे म्हणाले की, शुक्रवारी सकाळपासून आनंद दिघे यांच्या आश्रमातील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. याबाबत अनेक लोकांनी मला फोन करून विचारले की, अशी कोणती प्रथा किंवा परंपरा आहे का, जिथे दिघेसाहेबांच्या आनंद आश्रमात पैसे उधळे जातात. ही खूप निंदनीय आणि दुःखद गोष्ट आहे.ज्या आनंद आश्रमात लोकांना न्याय दिला जात होता,त्या ठिकाणी असा प्रकार घडणे निंदनीय आहे. आता आनंद आश्रम.. आधीसारखा राहिलेला नाहीये. तर आपला आनंद हरपला आहे,अशी टीका केदार दिघे यांनी केली आहे.

केदार दिघे यांच्या टीकेनंतर शिंदे गटाकडून सांगण्यात आलं की, एक ढोल पथक ठाण्यातील आंनंद आश्रमात आलं होतं. यावेळी हा प्रकार घडला.  विशेष म्हणजे गणेशोत्सवानिमित्त ढोल पथक आनंद मठात येणं ही परंपरा आहे. ही परंपरा १९८० पासूनची आहे. आनंद दिघे हयात असताना देखील संबंधित ढोल पथक आनंद मठात येत असे आणि जल्लोष होत असायचा. तीच प्रथा आजही सुरु असल्याची प्रतिक्रिया देण्यात आली.

शिंदे गटाचे खासदार नरेश मस्के म्हणाले की, ठाण्यातील आनंद आश्रम या ठिकाणी असलेला एक व्हिडिओ समोर आला आहे. ही दिघे साहेबांच्या आश्रमातील प्रथा आहे. दिघे साहेब असतानाही गणपती विसर्जनावेळी अशा प्रकारे लहान मुलं ढोल वाजवत त्यांना भेटायला यायचे. त्यावेळी दिघेसाहेब  बक्षीस म्हणून त्यांना पैसे द्यायचे. मात्र काही लोक आता यावर टीका करत आहेत.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर