Dombivli Minor Girl Hangs Self: ठाण्यातील डोंबिवली परिसरातून पालकांना चिंतेत टाकणारी माहिती समोर येत आहे. मेसेजिंग ॲप स्नॅपचॅट डाउनलोड करण्यास वडिलांना नकार दिला म्हणून एका १६ वर्षाच्या मुलीने आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (२४ जून २०२४) घडली. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात आत्महत्येची नोंद केली असून पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत मुलीने तिच्या मोबाईलमध्ये स्नॅपचॅट ॲप्लिकेशन डाउनलोड केले होते. मात्र, वडिलांनी तिच्या मोबाईलमधून स्नॅपचॅट ॲप्लिकेशन हटवून टाकले आणि तिला पुन्हा डाउनलोड न करण्यास सांगितले. परंतु, यामुळे तिला राग आला आणि तिने शुक्रवारी रात्री घरातील बेडरुमच्या छताला गळफास लावून आत्महत्या केली. शनिवारी दुसऱ्या दिवशी कुटुंबाला ती छताला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली.
मानपाडा पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले. मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी आत्महत्येची नोंद केली असून पुढील तपासाला सुरुवात केली आहे. या घटनेने आजूबाजुच्या परिसरात चिंताजनक वातावरण निर्माण झाले.
पंजाबमधील बर्नाला येथे आई, मुलगी आणि पाळीव कुत्र्याची गोळ्या झाडून हत्या केल्यानंतर एका व्यक्तीने स्वत:ही आत्महत्या केली. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, रामराज्य कॉलनीतील त्यांच्या निवासस्थानी ही घटना घडली. कुलबीर मानसिंह (वय, ५०) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. मानसिंहने आत्महत्या करण्यापूर्वी मुलगी निम्रत कौर (वय, २१) आई बलवंत कौर (वय, ८५) आणि त्यांच्या कुत्र्याची गोळी झाडून हत्या केली. त्यानंतर स्वत:ही आत्महत्या केली. मानसिंह यांची पत्नी रमणदीप बाजारात गेल्या असताना संध्याकाळी ही घटना घडली. रमणदीप घरी परतल्या असता घरासमोरचे गेट आतून बंद असल्याचे दिसले, त्यांनी याबाबत शेजाऱ्यांना माहिती दिली. रमणदीप शेजाऱ्यांसोबत घरात गेली असता त्यांची मुलगी आणि सासू घराच्या वेगवेगळ्या खोल्यांमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. तर, कुत्रा अंगणात पडलेला होता.
संबंधित बातम्या