मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Thane Sex Racket: ठाण्यात रिसॉर्टच्या नावाखाली सेक्स रॅकेट, एका महिलेला अटक; ३ तरुणींची सुटका

Thane Sex Racket: ठाण्यात रिसॉर्टच्या नावाखाली सेक्स रॅकेट, एका महिलेला अटक; ३ तरुणींची सुटका

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Feb 02, 2024 02:00 PM IST

Sex Racket Busted in Thane: ठाण्यातील एका रिसॉर्टमध्ये सुरु असलेल्या सेक्ट रॅकेटचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे.

Thane Sex Racket
Thane Sex Racket

Thane Resort Sex Racket Busted: ठाणे जिल्ह्यातील मीरा भाईंदर शहरात रिसॉर्टच्या नावाखाली सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी २७ वर्षीय महिलेला अटक केली आहे. तर, २० वर्षाखालील तीन तरुणींची सुटका करण्यात आली, अशी माहिती समोर आली. याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक तपास करीत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आरतीदेवी पंकजकुमार लहर असे अटक करण्यात आलेल्या आरोपी महिलेचे नाव आहे. आरोपी महिला ठाण्यातील मीरा-भाईंदर येथील उत्तन भागातील एका रिसॉर्टमध्ये सेक्स रॅकेट चालवत असल्याची पोलिसांनी माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून आरोपी महिलेला रंगेहाथ पकडले. या महिलेविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ३७० (३) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

यापू्र्वी मुंबईतील वर्सोवा येथे ब्युटी सलून आणि स्पाच्या नावाखाली सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त परमजीत दहिया आयपीएस (पश्चिम क्षेत्र), पोलिस उपायुक्त कृष्णकांत उपाध्याय आयपीएस (झोन 9), आणि वर्सोवा विभागाचे सहायक पोलिस आयुक्त शशिकांत माने यांच्या देखरेखीखाली वर्सोवा पोलिस युनिटने ही कारवाई केली.

WhatsApp channel

विभाग