गर्भवती महिलेला हमालांच्या मदतीनं चक्क हातगाडीवरुन रुग्णालयात आणलं मात्र.. कल्याणमधील संतापजनक प्रकार
Kalyan Hospital : एका गर्भवती महिलेला प्रसुतीसाठी दाखल करून घेण्यास महापालिका रुग्णालयाने नकार दिल्यानं रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच महिलेची प्रसुती झाली.
कल्याण महापालिकेच्या रुग्णालयात एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. एका गर्भवती महिलेला प्रसुतीसाठी दाखल करून घेण्यास महापालिका रुग्णालयाने नकार दिल्यानं रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच महिलेची प्रसुती झाली. या घटनेवर नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
ट्रेंडिंग न्यूज
राबिया साधू सिद असे या प्रसूती झालेल्या महिलेचे नाव आहे. राबियाला कल्याणच्या स्काय वॉकवर प्रसुती वेदना सुरू झाल्यानंतर तिला नागरिकांनी व रेल्वे स्टेशनवरच्या हमालांनी एका हातगाडीवर ठेऊन मनपा रुग्णालयात आणलं. मात्र तिथल्या डॉक्टर्सनी स्टाफ नसल्याचं सांगत या महिलेला दाखल करुन घेण्यास नकार दिला. पोलिसांनी विनंती करूनही रुग्णालय आपल्या निर्णयावर ठाम राहिले व यामुळे महिलेची प्रसुती रुग्णालयबाहेर गेटवरच झाली आणि तीने एका गोंडस मुलीला जन्म दिला. या घटनेमुळे रुग्णालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
राबिया सीद हिला कल्याण स्टेशन परिसरातील स्काय वॉकवर प्रसूतीच्या वेदना सुरु झाल्या. तिची अवस्था पाहून परिसरातील नागरिकांनी पोलिसांना कळविले. पोलिसांनी तातडीने स्कायवॉक गाठून तिला हमालांच्या मदतीने हातगाडीवरून रुक्णीबाई रुग्णालयात नेले. त्याठिकाणी रुग्णालयातील स्टाफने प्रसूतीसाठी स्टाफ नसल्याचे सांगून महिलेली प्रसूती करण्यास नकार दिला. त्यावेळी पोलिस यांनी रुग्णालयाकडे विनंती केली. महिलेच्या पोटातील बाळ हे अर्धे बाहेर आले आहे. तिची प्रसूती झाली नाही तर तिच्यासह तिच्या बाळाचा मृत्यू होईल. या विनंती करूनही रुग्णालयाला दया आली नाही. व त्यांनी महिलेला महापालिकेच्या वसंत व्हॅली येथील प्रसूती गृहात घेऊन जाण्यास सांगितले. अखेरीस त्या महिलेची प्रसूती रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ झाली. प्रसूतीनंतर रुग्णालयाने महिलेला तिच्या नवजात मुलीसह तिला रुग्णवाहिकेतून वसंत व्हॅली प्रसूतीगृहात पाठविण्यात आले.
दरम्यान घडल्या प्रकाराविषयी रुग्णालयात ड्यूटीवर असलेल्या डॉक्टरांनी काहीही बोलण्यास नकार दिला.
विभाग