ठाण्यात मोठी दुर्घटना.. इमारतीची लिफ्ट कोसळून ७ जणांचा मृत्यू
thane lift Accident : ठाण्यात निर्माणाधीन इमारतीचीलिफ्ट कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे.प्राथमिक माहितीनुसार,यामध्ये सहा ते सात जणांचा मृत्यू झाल्याचेसमोर आले आहे.
ठाण्यातून मोठी दुर्घटना घडली आहे. इमारतीची अंडरग्राउंड लिफ्ट कोसळून मोठी दुर्घटना घडली असून या घटनेत ७ जणांचा मृत्यू झाला आहे. ठाण्यातील बाळकुम येथे ही घटना घडली. निर्माणाधीन इमारतीची लिफ्ट कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार, यामध्ये सहा ते सात जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. बचावकार्य सुरु आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ट्रेंडिंग न्यूज
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे पश्चिम बालकुम येथील हायलँड पार्कमध्ये नारायणी स्कूलच्या बाजूला असलेल्या रुणवाल गार्डनमध्ये ही घटना घडली आहे. अंडरग्राउंड लिफ्ट कोसळल्याने सात जण मृत्युमुखी पडले आहेत. लिफ्टमध्ये एकूण ८ जण होते, त्यापैकी ७ जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.
लिफ्टमध्ये बिघाड झाल्यानं लिफ्ट उंचावरून खाली कोसळल्याचं सांगितलं जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचावपथक घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे.
बाळकुम येथील नारायणी शाळेच्या बाजूला रुणवाल आयरीन ही इमारत नुकतीच बांधून तयार झाली होती. या ४० मजली इमारतीच्या टेरेसवर वॉटरप्रूफिंगचे काम सुरू होते. हे काम संपवून कामगार खाली येत असताना लिफ्टचा दोर तुटल्याने रविवारी रात्री ७ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
विभाग