ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. तु मला आवडत नाहीस, तुझे बाहेर कोणासोबत तरी अनैतिक संबंध सुरू आहेत, अशा वारंवारच्या टोमण्यांमुळे विवाहितेने गळफास घेत आपले जीवन संपवले आहे. ही घटना शहापूर तालुक्यातील सरलांबे गावात घडली आहे. याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात सासरच्या चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पती आणि सासऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे.
कृतिका म्हात्रे असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव हेआ. पती तिच्या चारित्र्यावर संशय घेत वारंवार शिवीगाळ आणि मानसिक त्रास देत होता. सासरच्या लोकांकडून होणाऱ्या त्रासाला कृतिका कंटाळली होती. तू मला आवडत नाहीस, तुझे बाहेर अनैतिक संबंध आहेत, असे आरोप करत विवाहितेला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी महिलेचा पती, सासू-सासरा आणि दीर या चौघांविरोधात शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पती आणि सासऱ्याला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार भिवंडी तालुक्यातील खारबाव येथील कृतिका हिचा विवाह काही महिन्यापूर्वी शहापूर तालुक्यातील सरलांबे येथील वैभव अधिकारी या तरुणाशी झाला होता. मात्र लग्नानंतर काही दिवसातच तिला सासरचे लोक त्रास देऊ लागले. मात्र तू मला आवडत नाहीस तुझे बाहेर अनैतिक संबंध आहेत, असे म्हणत वैभव पत्नी कृतीकाला त्रास देऊ लागला. पती नेहमीच शिवीगाळ करायचा तर सासरा जनार्दन, सासू रत्ना आणि दीर समीर तिच्याकडे पैशाची मागणी करायचे कृतिकाच्या वडिलांची जमीन बुलेट ट्रेनच्या प्रकल्पात गेली आहे. याचे मिळालेले पैसे आणण्यासाठी कृतिकाला त्रास देत होते.
सासरच्या मंडळीकडून होणाऱ्या त्रासाला वैतागून कृतिकाने टोकाचं पाऊल उचलंल. तिने राहत्या घरी ळफास घेऊन आपले जीवन संपवले. कृतिकाच्या माहेरच्या नातेवाईकांनी शहापूर पोलीस ठाण्यात सासरच्या लोकांविरोधात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरुन पती, सासू-सासरा व दीरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पती व सासरा यांना अटक केली आहे.