ठाणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. अंबरनाथमधील मोरिवली औद्योगिक वसाहतीमधील एका केमिकल कंपनीत गळती झाली असून रासायनिक धूर संपूर्ण शहरात पसरला आहे. अंबरनाथ शहरातील हवेत केमिकलचा धूर पसरला असून रेल्वे मार्गावरही धुराचे साम्राज्य असून दृश्यमानता कमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
शहरभर रासायनिक धूर पसरल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. दरम्यान, या गॅस गळतीमुळे कोणत्याही प्रकारची प्रकारच्या नुकसानीचे वृत्त समोर आलेले नाही. गळती कशामुळे झाली याचे तपास केला जात आहे. या प्रकरणाचा प्रशासनाकडून तपास केला जात आहे.
दरम्यान ही वायू गळती का झाली याची कारण अद्याप समजू शकलं नाहीये. रात्रीच्या सुमारास मोरिवली एमआयडीसीतील एका केमिकल कंपनीतून गॅस गळती होऊ लागली आहे. संपूर्ण अंबरनाथ शहरात धूर पसरला असून याचा नागरिकांना त्रास जाणवू लागल्याचे वृत्त आहे. नागरिकांचे डोळे चुरचुरणे, घश्यात खरखर, मळमळ होणे आदि त्रास होऊ लागले आहेत.
रासायनिक वायू शहरभर पसरल्याने वातावरणातील दृश्यमानता कमी झाली आहे. रेल्वे रुळावरील दृश्यमानता कमी झाली आहे. याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकलेला नाही. संपूर्ण शहरात धूर पसरला असल्याने भयाण परिस्थिती निर्माण झालीय. नागरिकांना आरोग्याच्या समस्या उद्धभवत असून अनेकांना उलट्या होत आहेत,तर काहींना घसा खवखवण्याचा त्रास जाणवत आहे.