ठाण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आठ महिन्याच्या बाळाला औषधांचा ओव्हरडोस झाल्याने मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर बाळाचे शवविच्छेदन नको म्हणून आपल्या आठ महिन्याच्या मुलाचा मृतदेह घेऊन बाप पसार झाला आहे.या घटनेनं खळबळ उडाली असूनठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात ही घटनाघडलीआहे.
गुरुवारी रात्री साडेदहाच्या दरम्यान याबाळाला रुग्णालयात आणले होते. त्याच्यावर उपचार सुरू असतानाच आज पहाटे त्याचा मृत्यू झाला. बाळाला न्यूमोनिया व खोकल्याचा त्रास होऊ लागल्याने त्याला रुग्णालयात दाखल केलं होतं. त्याला खोकल्याच्या व न्यूमोनियाऔषधांचाओव्हर डोस दिल्याचं समोर आलं होतं. यातच बाळाचा मृत्यू झाल्याचं बोललं जात आहे. बाळाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेद करावं लागेल असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. बाळाच्या वडिलांनी शवविच्छेदनाला विरोध केला व कोणालाही न सांगता तो बाळाचा मृतदेह घेऊन रुग्णालयातून पसार झाला.
बाळाचा मृतदेह घेऊन जाताना सुरक्षा रक्षकांनी अडवलं होतं. मात्र नातेवाईकांनी सुरक्षा रक्षकांना पकडून ठेवलं व तो बाळाच्या मृतदेहासह रिक्षात बसून पसार झाला होता. ही घटना लक्षात आल्यानंतर रुग्णालयात एकच गोंधळ उडाला.
रुग्णालय प्रशासनाकडून याची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी तातडीनं कारवाई करत शीळ डायघर येथून बापाला मुलाच्या मृतदेहासह ताब्यात घेतलं. बाळाचा मृतदेह परत रुग्णालयात आणण्यात आला.
संबंधित बातम्या