घातपाताचा कट..! ठाण्याच्या मुंब्रा दिवा खाडीत आढळले १७ डिटोनेटर्स आणि १६ जिलेटिनच्या कांड्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  घातपाताचा कट..! ठाण्याच्या मुंब्रा दिवा खाडीत आढळले १७ डिटोनेटर्स आणि १६ जिलेटिनच्या कांड्या

घातपाताचा कट..! ठाण्याच्या मुंब्रा दिवा खाडीत आढळले १७ डिटोनेटर्स आणि १६ जिलेटिनच्या कांड्या

Sep 12, 2023 08:04 PM IST

Thane Crime news : ठाण्याच्या मुंब्रा-दिवा खाडीत मोठ्या प्रमाणात स्फोटकं सापडल्याने खळबळ उडाली आहे. ही स्फोटके पोलिसांकडून जप्त करण्यात आली आहेत.

Thane news
Thane news

ठाण्यात मोठ्या घातपाताचा कट उघडकीस आला आहे. ठाण्याच्या मुंब्रा-दिवा खाडीत मोठ्या प्रमाणात स्फोटकं सापडल्याने खळबळ उडाली आहे. ही स्फोटके पोलिसांकडून जप्त करण्यात आली आहेत. मुंब्रा येथील उल्हास नदीत एका बार्जमध्ये ही स्फोटकं आढळली. जप्त केलेली स्फोटके कळवा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली आहेत. 

या छाप्यात १७ डिटोनेटर्स आणि १६ जिलेटिनच्या कांड्या जप्त करण्यात आल्या आहेत. दिवा भागात सक्शन पंप वापरून अवैधरित्या रेती उत्खनन सुरू असल्याची माहिती स्थानिक मच्छीमारानी दिली होती. त्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांच्या विशेष पथकाने त्या ठिकाणी धाड टाकली. 

या विशेष धाडीत १७ डिटोनेटर्स, १६ जिलेटिनच्या कांड्या जप्त करण्यात आल्या असून, बॉम्ब शोधक पथकाला तातडीने पाचारण करण्यात आले. या छाप्यानंतर पोलिसांनी सांगितले की, या स्फोटकांचा वापर कोणत्याही घातपातासाठी केला जाणार नसून ही स्फोटके रेती उत्खननासाठीच  वापरण्यात येत होती. 

ठाण्यात खाडी परिसरात अवैधपणे रेती उपसा केला जात असून. महसूल प्रशासनाकडून या रेती उपशांवर वारंवार धाडी टाकल्या जात आहेत. तहसीलदार युवराज बांगर यांच्या पथकानं मुंब्रा खाडी पात्रात उतरून उपसा सुरू असलेल्या ठिकाणी धाडी मारल्या होत्या. पथकाने सर्व साहित्य आणि बोटीही जप्त केल्या होत्या. यात अंदाजे दीड कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. या छाप्याने वाळू माफियांचे कंबरडे मोडले आहे.

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर