मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbra accident : ठाण्याजवळ मुंब्रा येथे भीषण अपघात! सिमेंट मिक्सर उलटल्याने एकाचा जागीच मृत्यू, ७ गंभीर

Mumbra accident : ठाण्याजवळ मुंब्रा येथे भीषण अपघात! सिमेंट मिक्सर उलटल्याने एकाचा जागीच मृत्यू, ७ गंभीर

Jun 16, 2024 10:26 AM IST

Mumbra cement mixter Accident : ठाण्याजवळील मुंब्रा येथे सीमेंट मिक्सर वाहन उलटल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला तर ७ जण जखमी झाले आहेत. ही घटना शनिवारी रात्री घडली.

मुंब्र्यात भीषण अपघात! सिमेंट मिक्सर उलटल्याने  एकाचा जागीच मृत्यू ७ गंभीर
मुंब्र्यात भीषण अपघात! सिमेंट मिक्सर उलटल्याने एकाचा जागीच मृत्यू ७ गंभीर

Thane Mumbra Accident : ठाण्यातील मुंब्रा येथे भीषण अपघात झाला आहे. एका सोसायटीत सिमेंट मिक्सर कोसळल्याने हा अपघात झाला आहे. सिमेंट मिक्सरचा तोल गेल्याने तो सोसायटीच्या आवारात कोसळला. यावेळी या ठिकाणी खेळत असलेली ७ मुले गंभीर जखमी झाली तर, एका मुलाचा मृत्यू झाला आहे. सम्राट नगर येथे प्रथमेश सोसायटीच्या आवारात ही घटना घडली. अपघात झाल्यावर चालक फरार झाला आहे.

नासिर शेख (वय १४) असे या घटनेत मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. तर विशाल सोनावणे (वय २५), अशिक इनामदार (वय १५), प्रभाकर सलियान (वय ४८, अब्दुल वफा (वय ५०), फरीद शेख (वय ५४), आशा दाधवड (वय ५८) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ठाण्या जवळील मुंब्रा येथील सम्राट नगर येथील एका परिसरात एका सिमेंट मिक्सरचा विचित्र अपघात झाला. सिमेंट मिक्सर वाहनाच्या वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने मिक्सर एका सोसायटीची संरक्षण भिंत तोडून सोसायटीच्या आवारात उलटला. या अपघातात या अपघातात ७ जण जखमी तर १ जण मृत्युमुखी पाडला. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल व पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमी नागरिकांना जवळील दवाखान्यात भरती केले. तर अपघात झाल्यावर चालक फरार झाला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यावर आमदार जितेंद्र आव्हाड देखील घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त सिमेंट मिक्सर क्रेनच्या साह्याने बाजूला करण्यात आला.

असा झाला अपघात

मुंब्रा येथील सम्राट नगर येथे बांधकाम सुरू आहे. या कामासाठी वापरल्या जाणाऱ्या खडी सिमेंट मिक्स करणाऱ्या आरएमसी व्हॅनवरील चालकाचा ताबा सुटल्याने हा ट्रक कोसळला. यामुळे सोसायटीतील ७ मुले गंभीर जखमी झाली तर एकाचा मृत्यू झाला. आरएमसी व्हॅन चालक अपघात झल्यावर फरार झाला. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने बचावकार्य राबवले.

Mumbai Local Train: मुंबईकरांनो आज घराबाहेर पडण्यापूर्वी लोकलचं वेळापत्रक बघा! मुख्य, हार्बर मार्गावर ‘मरे’चा मेगाब्लॉक

मुंब्रा पोलीस स्थानकाचे पोलीस कर्मचारी, रुग्णवाहिकेसह तसेच मुंब्रा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त, अग्निशमन दलाचे जवान , इमर्जन्सी टेंडर , रेस्क्यु वाहनासह, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी व आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी उपस्थित झाले.

अपघाताची जबाबदारी कोण घेणार?: जितेंद्र आव्हाड

यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी घटनास्थळी येथ पाहणी केली. आव्हाड म्हणाले,  मुंब्र्यात (सम्राट नगर) पुन्हा एकदा अपघात घडला. दोन लोकांना जीव गमवावा लागला.तर अनेक जण जखमी झाले आहेत. ठाणे महानगरपालिकेला वेळोवेळी विनंती करून देखील या परिसरात स्पीडब्रेकर बसवण्यात येत नाहीयेत. उतार असल्याने मोठी वाहने भरधाव वेगात येतात. परिणामी स्पीडब्रेकर नसल्याने अपघात होण्याचा धोका वाढतो. पंधरा दिवसापूर्वी असाच अपघात झाला होता. त्यावेळी देखील महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास ही बाब आणून दिली होती. पण महापालिका प्रशासन नेहमीप्रमाणे ढीम्म बसून राहिले, आणि आज दोन तरुणांना आपला जीव गमवावा लागला. माझी मागणी आहे की, जीव गमावावा लागलेल्या तरुणांच्या परिवाराला किमान २० लाख रुपये भरपाई मिळावी तसेच जखमी झालेल्या नागरिकांना देखील उचित भरपाई मिळावी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्याच्या आहेत. मला खात्री आहे या प्रकरणात ते दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करतील.

WhatsApp channel
विभाग