Thane Municipal Corporation: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे आणि मीरा भाईंदरमधील अंमली पदार्थांचा व्यवसाय होत असलेली अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश दिले. यानंतर ठाणे महानगरपालिकेने शहरातील बेकायदा बार आणि पबवर ठाणे बुलडोझर फिरवला. अंमली पदार्थांचे मुळे तरुणांचे प्रचंड नुकसान होत आहे. ठाणे आणि मीरा भाईंदर ही शहरे अंमली पदार्थ्यांच्या विळख्यातून मुक्त व्हावीत, अशी इच्छा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
पुण्याच्या एफसी रोडवरील एका प्रसिद्ध हॉटेलमधील व्हिडिओ समोर आला, ज्यात दोन अल्पवयीन मुले अंमली पदार्थांचे सेवन करताना दिसले. यानंतर पुण्यातील अनधिकृत बांधकाम आणि अंमली पदार्थांना प्रोत्साहन देणाऱ्या हॉटेल आणि बारवर कारवाई करण्यात आली. यानंतर एकना शिंदे यांनी ठाणे आणि मीरा-भाईंदर शहराला अमली पदार्थमुक्त करण्यासाठी पब्ज आणि बारवर कारवाई करण्याचे महापालिकेला आदेश दिले.
ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त गजानन गोदापूर यांनी सांगितले की, "ठाणे महानगरपालिकेच्या अंतर्गत अवैध हुक्का पार्लर आणि ड्रग्ज विक्री करणारे बार आणि रेस्टॉरंट उद्ध्वस्त करण्यास सुरुवात झाली. घटनास्थळी ठाणे पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला. याशिवाय ठाण्यात अंमली पदार्थांची विक्री आणि सेवन करणाऱ्यांवर गुन्हे शाखा नजर ठेवून आहे. ज्या ठिकाणी अशा ड्रग्जची विक्री आणि खरेदी केली जाते, अशा हॉटेल आणि बारवर बुलडोझर फिरवला जात आहे."
अमली पदार्थांमुळे तरुणांचे खूप नुकसान होत आहे. यामुळे अंमली पदार्थांची विक्री थांबवण्यासाठी पावले उचलण्याची गरज आहे. जेसीबी, बुलडोझर लावून बेकायदा बांधकामे मुळासकट तोडून टाका. अमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. तसेच, या कारवाईदरम्यान कोणी कोणाला पाठीशी घालत असेल तर, त्यांच्यावरही कारवाई केली जाईल, असाही इशारा देण्यात आला. ड्रग्ज प्रकरणावरून विरोधक आक्रमक झाले असून ते सरकारवर सातत्याने टीका करत आहेत याप्रकरणातील दोषींविरोधात कठोर कारवाई केली जाईल, विरोधकांनी उगाच यावर राजकारण करू नये, असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
संबंधित बातम्या