Mumbra: मराठीत बोलायला सांगणाऱ्या तरुणाला फळ विक्रेत्यांनी मागायला लावली माफी, मुंब्रा येथील प्रकार
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbra: मराठीत बोलायला सांगणाऱ्या तरुणाला फळ विक्रेत्यांनी मागायला लावली माफी, मुंब्रा येथील प्रकार

Mumbra: मराठीत बोलायला सांगणाऱ्या तरुणाला फळ विक्रेत्यांनी मागायला लावली माफी, मुंब्रा येथील प्रकार

Jan 03, 2025 03:12 PM IST

Mumbra Marathi Youth Viral Video: मुंब्रा येथे मराठी बोलण्याचा आग्रह धरणाऱ्या एका तरुणाला फळ विक्रेत्यांनी भरबाजारात कान पकडून माफी मागायला लावली.

मुंब्रा : मराठीत बोलायला सांगणाऱ्या तरुणाला फळ विक्रेत्यांनी मागायला लावली माफी
मुंब्रा : मराठीत बोलायला सांगणाऱ्या तरुणाला फळ विक्रेत्यांनी मागायला लावली माफी

Mumbra News: कल्याणमध्ये परप्रांतीय व्यक्तीने मराठी कुटुंबाला मारहाण केल्याची घटना ताजी असताना मुंब्रा येथे परप्रांतीय फळविक्रेत्यांनी मराठी तरुणाला माफी मागायला लावल्याची घटना घडली. संबंधित तरुणाने फळविक्रेत्याला मराठीत फळांची किंमत विचारली. मात्र, विक्रेत्याला मराठी येत नसल्याने दोघांमध्ये वाद सुरू झाला. यानंतर हा वाद इतका पेटला की, मुंब्रा पोलिसांना घटनास्थळी धाव घ्यावी लागली. धक्कादायक बाब म्हणजे, पोलिसांनी मराठी मुलाची बाजू न घेता फळविक्रेत्याच्या तक्रारीवरून तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला. संबंधित घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली असून या घटनेने महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे.

विशाल गवळी असे संबंधित तरुणाचे नाव आहे.विशाल फळ खरेदी गेला असता त्याने विक्रेत्याला मराठीत फळाची किंमत विचारली. मात्र, फळ विक्रेत्याने त्याला मराठी भाषा समजत नाही असे म्हणत विशालला मराठी बोलायला सांगितले. त्यावेळी विशालने महाराष्ट्रात राहायचे असेल तर, मराठी बोलता आली पाहिजे, असा आग्रह धरला. मात्र, यावरून विशाल आणि विक्रेत्यामध्ये बाचाबाची सुरू झाली. हा वाद वाढल्याने फळविक्रेताच्या साथीदारांनी विशाला घेरले आणि दमदाटी करत त्याला शिवीगाळ देखील केली. याबाबत समजताच मुंब्रा पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि फळविक्रेत्याच्य तक्रारीवरून तरुणाला ताब्यात घेतले. तसेच त्याच्याविरुद्ध शांतता भंगाचा अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. या तरुणाची मानसिक स्थिती स्थिर नसल्याचे त्याच्या आईने म्हटले आणि त्याच्यावर कोणतीही कारवाई न करण्याचे विनंती केली.

@ekikaranmarathi या ट्विटर हँडवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, मुंब्रा मराठीची मागणी केली म्हणून तेथील परप्रांतीयांनी जमाव करून मराठी मुलाला मारहाण करून माफी मागायला लावली, पोलिसांनी या मुलालाच ठाण्यात घेऊन गेले.आणखीन किती घटना? हे मराठी राज्यात घडते'

कल्याण येथे काही दिवसांपूर्वीच मराठी कुटुंबाला परप्रांतीयांकडून मारहाण करण्यात आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. महाराष्ट्रात राहायचे, व्यवसाय करायचा आणि मराठी बोलता न येणे इथपर्यंत ठीक आहे. पण मराठी बोलणारच नाही, असे छातीठोकपणे बोलणाऱ्या अमराठी नागरिकांना नेमका काय मेसेज द्यायचा आहे? महाराष्ट्रात राहून मराठी भाषेबद्दल इतका द्वेष का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर