Thane: लग्नाचे आमिष दाखवून बार गायिकेवर बलात्कार, आक्षेपार्ह फोटो मित्रांना पाठवले; गुन्हा दाखल
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Thane: लग्नाचे आमिष दाखवून बार गायिकेवर बलात्कार, आक्षेपार्ह फोटो मित्रांना पाठवले; गुन्हा दाखल

Thane: लग्नाचे आमिष दाखवून बार गायिकेवर बलात्कार, आक्षेपार्ह फोटो मित्रांना पाठवले; गुन्हा दाखल

Jan 13, 2025 12:05 PM IST

Thane Bar Singer Rape: ठाण्यात एका बारमध्ये गायिका म्हणून काम करणाऱ्या महिलेवर अत्याचार करून तिचे आक्षेपार्ह फोटो मित्रांना पाठवल्याप्रकरणी एका सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली.

ठाणे: लग्नाचे आमिष दाखवून बार गायिकेवर अत्याचार
ठाणे: लग्नाचे आमिष दाखवून बार गायिकेवर अत्याचार

Thane News: ठाण्यात लग्नाचे आमिष दाखवून एका २५ वर्षीय बार सिंगरशी शारीरिक संबंध ठेवून तिची बदनामी केल्याप्रकरणी ठाणे पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. काही महिन्यांपूर्वीच आरोपी आणि पीडित महिला यांच्यात मैत्री झाली. यानंतर आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला. तसेच तिचे आक्षेपार्ह फोटो जवळच्या लोकांना पाठवले. याबाबत समजताच पीडिताने नारपोली पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात तक्रार दिली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी अटक केलेला आरोपी सराईत गुन्हेगार आहे. तर, पीडिता आपला उदरनिर्वाह करण्यासाठी ठाण्यातील एका बारमध्ये गायिका म्हणून काम करते. पीडिता आणि आरोपी यांच्यात गेल्या वर्षी मैत्री झाली. त्यानंतर आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून तिला ११ नोव्हेंबर रोजी भिवंडी परिसरातील एका लॉजमध्ये नेले. तिथे दोघांनीही मद्यपान केले. त्यानंतर आरोपीने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवून तिचे आक्षेपार्ह फोटो काढले आणि जवळच्या लोकांना पाठवले, असे पीडिताने दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले.

महिलेने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून शनिवारी त्याला अटक केली. आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ६९ (फसवे मार्ग वापरून लैंगिक संबंध ठेवणे), ७७ (विनयभंग) आणि ३५६ (मानहानी) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यातील तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यात गेल्या पाच वर्षात सर्वाधिक बलात्काराच्या घटना २०२३ मध्ये घडल्या आहेत. दरम्यान, २०१७ मध्ये राज्यात एकूण ४ हजार ३२० बलात्काराच्या घटना घडल्या. तर, २०१८ मध्ये ४ हजार ९७४ बलात्काराच्या घटना नोंदवण्यात आल्या. तर, २०१९- ५ हजार ४१२ घटना, २०२० मध्ये ४ हजार ८४६ घटना, २०२१- ५ हजार ९५४ घटना, २०२२ मध्ये ७ हजार ८४ आणि २०२३ मध्ये ७ हजार ५२१ घटना घडल्या आहेत. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात दिवसेंदिवस महिला अत्याचाराच्या संख्येत वाढ होत असून राज्यात महिला सुरक्षित नसल्याचे स्पष्ट होत आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर