मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Thane: तरुणानं गुपचूप बनवला लिव्ह इन पार्टनरचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ, संबंध तुटताच केला व्हायरल

Thane: तरुणानं गुपचूप बनवला लिव्ह इन पार्टनरचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ, संबंध तुटताच केला व्हायरल

Jun 28, 2024 09:38 PM IST

Thane Man Share live in Partner Private Video: लिव्ह इन पार्टनरचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी ठाण्यातील तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

लिव्ह इन पार्टनरचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी एकाविरोधात गुन्हा दाखल
लिव्ह इन पार्टनरचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी एकाविरोधात गुन्हा दाखल

Thane live in partner News: लिव्ह इन पार्टनरचा अंधोळ करतानाचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी ठाण्यातील एका तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीने आरोपीसोबतचे प्रेमसंबंध तोडल्यानंतर हा प्रकार घडला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, किरण बागराव, असे आरोपी व्यक्तीचे नाव आहे. आरोपी हा ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथील रहिवासी आहे. पीडित महिला आणि आरोपी ऑगस्ट २०२२ ते जानेवारी २०२४ पर्यंत डोंबिवली आणि मजिवडा येथे रिलेशनशिपमध्ये राहत होते. मात्र, पीडित महिलेने आरोपीसोबत राहण्यास नकार देताच त्याने तिचा गुपचूप अंघोळ करताना बनवलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला.

ट्रेंडिंग न्यूज

पीडितेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, ती आरोपीसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. या काळात आरोपीने महिलेचे दागिने नेले. एवढेच नव्हेतर एकदा तिचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ देखील बनवला. काही दिवसानंतर महिलेने आरोपीसोबतचे संबंध तोडून टाकले आणि त्याच्याकडे आपल्या दागिन्यांची मागणी केली. यानंतर आरोपीने तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. एवढेच नव्हेतर पीडिताने भेटण्यास नकार देताच आरोपीने तिला जीवे मारण्याची धमकी दिली.

सोलापूर: चारित्र्याच्या संशयातून दगडाने ठेचून झोपेतच पत्नीची हत्या

सोलापूर जिल्ह्यातील तेलगाव भिमा येथे चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या करण्यात आली.याप्रकरणी पतीसह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. भाग्यश्री बसवराज कोळी असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. भाग्यश्री यांचा २०१४ मध्ये आरोपी बसवराज आडव्याप्पा कोळी याच्याशी लग्न झाले होते. आरोपी भाग्यश्रीच्या चारित्र्यावर संशय करायचा. यामुळे दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. याच वादातून आरोपीने २३ जून रोजी रात्री पत्नी झोपेत असताना तिच्या डोक्यात दगड घालून तिची हत्या केली. बसवराजने त्याच्या मेव्हुण्याला तुझ्या बहिणीची चारित्र्य चांगले नसल्याचे सांगितले होते. तिचे निंबर्गी येथील एकासोबत अनैतिक संबंध असल्याचे आरोपीने सांगितले होते.याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली.

 

WhatsApp channel
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर